Yellow urine symptoms: उन्हाळ्याच्या दिवसात लघवीचा रंग गडद असेल तर व्हा सावधान; 'या' आजारांचा असतो धोका

Yellow color urine symptoms: लघवीशी संबंधित काही लक्षणं शरीराच्या आजारांबद्दल अनेक संकेत देतात. जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. यामध्ये गडद रंगाची लघवी होण्यामागे काय कारणं असू शकतात ते पाहूयात.
Yellow color urine symptoms
Yellow color urine symptomssaam tv
Published On

उन्हाळ्याच्या दिवसात भरपूर प्रमाणात पाणी प्यावं असं म्हटलं जातं. जास्त पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला लघवीलाही सतत जावं लागतं. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, उन्हाळ्याच्या दिवसात लघवीच्या रंगाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला वारंवार लघवीचा रंग खूप गडद पिवळा दिसत असेल किंवा वास येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. हे शरीरात पाण्याच्या कमतरतेपासून ते गंभीर आजारांपर्यंत कोणत्याही गोष्टीचे लक्षण असू शकतं.

डॉक्टरांनी सांगितलं की, आपल्या लघवीचा रंग आपल्या आरोग्याबद्दल बरीट माहिती देतो. सामान्यपणे हलका पिवळा रंग तुमचं शरीर हायड्रेट आहे असं सागंतो. मात्र जर लघवीचा रंग गडद पिवळा, नारंगी, तपकिरी किंवा लाल असेल तर ते एखाद्या आजाराचें लक्षण असू शकतं.

डिहायड्रेशन (Dehydration)

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला अधिक पाण्याची आवश्यकता असते. या दिवसात शरीराला जास्त घाम येतो. परिणामी पाण्याची कमतरता निर्माण होते. ज्यावेळी शरीरात पुरेसं पाणी नसतं तेव्हा लघवी गडद पिवळी किंवा अगदी हलकी तपकिरी दिसू शकते. त्यामुळे हे डिहायड्रेशनचं प्रमाण असू शकतं.

Yellow color urine symptoms
Heart Attack: हार्ट अटॅक येण्याच्या २ दिवसांपूर्वी दिसतात 'ही' लक्षणं; वेळीच व्हा सतर्क

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन

जर लघवीचा रंग गडद पिवळा आणि त्याला वास येत असेल तर ते लघवीच्या संसर्गाचे लक्षण असू शकतं. ही समस्या महिलांमध्ये जास्त आढळते. त्यामुळे तुम्हाला हे लक्षण जाणवल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

यकृतासंबंधी समस्या

जर तुमचा रंग लघवी गडद किंवा नारंगी, तपकिरी असेल तर ते यकृताच्या समस्येचं लक्षण असू शकतं. ही स्थिती कावीळ किंवा हिपॅटायटीस सारख्या आजारांशी संबंधित असू शकते. त्यामुळे जर लघवीचा रंग असा आढल्यास डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करू नये.

Yellow color urine symptoms
Kidney Pain While Running: धावताना तुमच्या किडनीची काळजी कशी घ्याल, काय असू शकतो गंभीर धोका?

किडनीच्या समस्या

जर तुमचा लघवीचा रंग अधिकच गडद असेल तर बऱ्याच प्रकरणांमध्ये ते किडनी निकामी असल्याचं लक्षण मानलं जातं. यासोबतच जर तुम्हाला पाठदुखी, शरीरात सूज किंवा उलटी झाल्यासारखं वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Yellow color urine symptoms
Mosquitoes Bite: 'अशा' लोकांच्या जवळ अजिबात फिरकत नाहीत डास; काय आहे कारण?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com