Black Coffee Side Effects Saam TV
लाईफस्टाईल

Black Coffee Side Effects : या रुग्णांनी चुकूनही पिऊ नका ब्लॅक कॉफी; अन्यथा, आरोग्याच्या अनेक समस्या जडतील

Side Effects of Black Coffee : वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिताय? तोटेही जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Black Coffee Is Good For Health : सकाळची सुरुवात अनेकांची चहा किंवा कॉफीच्या सेवनाने होते. एक कप कॉफी आळस, थकवा दूर करण्यास मदत करते. अनेक जण आरोग्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर म्हणून त्याची निवड करतात. त्यामुळे आपला मूड सुधारतो.

ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते, परंतु जास्त प्रमाणात प्यायल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये असलेले कॅफिन शरीरासाठी हानिकारक आहे. जर तुम्ही नियमितपणे ब्लॅक कॉफी पिण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. तणाव

जर तुम्ही ब्लॅक कॉफी (Coffee) जास्त प्रमाणात पित असाल तर शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी वाढू शकते. जर तुम्ही आधीच तणावाच्या (Stress) समस्येने त्रस्त असाल तर कॅफीन घेणे टाळा.

2. झोपेचा अभाव

ब्लॅक कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला चांगली झोप घ्यायची असेल तर झोपण्याच्या काही तास आधी कॉफी पिणे टाळा.

3. पचन समस्या

ब्लॅक कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात कॅफिन आणि आम्ल असते. हे जास्त प्रमाणात प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. याशिवाय तुमच्या पोटात अॅसिडिटी (Acidity) आणि क्रॅम्प्सची समस्या देखील असू शकते.

4. दातांवर डाग

ब्लॅक कॉफीमुळे दातांवर डागही दिसतात. जर नियमितपणे याचे सेवन केले तर कॉफीमध्ये असलेल्या गडद रंगामुळे दातांचा रंग खराब होऊ शकतो.

5. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हानिकारक

जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी पिणे टाळावे. यामध्ये असलेले कॅफिन बीपीच्या पातळीला त्रास देऊ शकते. म्हणूनच जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टँकरचा भीषण अपघात

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

SCROLL FOR NEXT