Bitter Gourd Benefits
Bitter Gourd Benefits Saam Tv
लाईफस्टाईल

Bitter Gourd Benefits : चवीला कडू असणाऱ्या कारल्याचे आरोग्याला बहुगुणी फायदे !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bitter Gourd : निरोगी राहण्यासाठी फळे (Fruits) आणि भाज्या (Vegetables) खा हे आपल्या वडीलोपार्जीत लोकांकडून नेहमी सांगितले जाते. फळे आणि भाज्यांमध्ये विविध प्रकारचे पौष्टिक घटक असतात. अनेकदा मुलांना कारले खाण्याचा सल्ला देण्यात येतो. कारले कडू असले तरी अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे.

कारल्याचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. कारल्याचे सेवन आरोग्याला फायदेशीर ठरते. कारले खाल्ल्याने वजन कमी होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते. कारले हृदयाची गती निरोगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

कारले खाण्याचे फायदे -

सर्दी आणि खोकल्यामध्ये कारले फायदेशीर आहे -

कारल्याच्या पानांच्या रसात हळद मिसळून लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. कोंडापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणतीही महिला किंवा पुरुष कारल्याचे सेवन करू शकतात.

जेव्हा तुमचा आवाज काही कारणास्तव बसतो, जेव्हा तुमचा घसा खवखवतो किंवा आवाज खराब होतो तेव्हा ते दुरुस्त करण्यासाठी कारल्याचा फायदा होतो . कारल्याच्या मुळांची पेस्ट मध आणि तुळशीच्या रसात मिसळून सेवन करा.

वजन कमी -

कारले आणि त्यापासून तयार केलेला रस वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो. तसेच, शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी सलग दोन आठवडे कारल्याचा रस प्या. शरीरातील चरबी किंवा ऍडिपोज टिश्यू हे फॅटी ऍसिडच्या रासायनिक जोडलेल्या साखळ्यांनी बनलेले असते. कारल्याच्या रसामध्ये एन्झाईम्स असतात. ते मुक्त फॅटी ऍसिडमध्ये चरबीचे विभाजन करते. त्यामुळे शरीरातून चरबी कमी होऊ लागते.

गॅसचा त्रास होऊ देऊ नका -

जर तुम्हाला नेहमी गॅसचा त्रास होत असेल तर अर्धा कप कारल्याचा रस पाऊण कप पाण्यात मिसळा. त्यात एक चमचा आवळा पावडर घाला. दिवसातून तीन वेळा प्यायल्याने अॅसिडिटी दूर होते.

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा -

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले आणि त्याचा रस साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण उपाय आहे. एक चतुर्थांश कप कारल्याचा रस त्याच प्रमाणात गाजराच्या रसात मिसळून प्या. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होईल. कारल्याचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने जास्त फायदा होतो. जर तुम्हाला चव आवडत नसेल तर तुम्ही त्यात मध किंवा सफरचंदाचा रस घालू शकता. मधुमेहाच्या रुग्णांनी रस प्यायल्यानंतर एक तास काहीही खाऊ नये.

शरीरातून विष काढून टाकले -

कारल्यामध्ये सुमारे ९०% पाणी असते, जे भूक कमी करण्यास मदत करते. याशिवाय हा रस शरीरातील विषारी पदार्थही काढून टाकतो. शरीरातील विषारी घटक वजन वाढण्यास सर्वात जास्त जबाबदार असतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Politics: निवडणुकीपूर्वी दिल्लीत मोठी घडामोड; राघव चढ्ढा लंडनहून परताच घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, चर्चा गुलदस्त्यात

Dombivli : डोंबिवलीत गावगुंडांचा ट्रक चालकावर प्राणघातक हल्ला, एकास अटक

Mulund BJP | बघतोच आता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना थेट इशारा

Crime News: आयुर्वेदिक डॉक्टरकडून सुरु होता संतापजनक प्रकार! संभाजीनगरमधील खळबळजनक घटना नेमकी काय?

Gallstones News : पित्ताशयातील खडे कसे बरे होतात? वाचा डॉक्टरांनी सांगितलेले समज आणि गैरसमज

SCROLL FOR NEXT