Home Remedies : वाढत्या वयाबरोबर त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी 'हे' उपाय करा

त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढते आणि त्वचेची सैल होण्याची समस्या दूर होते.
Facial Care
Facial CareSaam Tv
Published on

अँटिऑक्सिडंट्स पदार्थाचे सेवन -

Intake of Antioxidants
Intake of Antioxidants Canva

वयानुसार त्वचा (Skin) अधिक सुंदर ठेवण्यासाठी अँटिऑक्सिडंट पदार्थांचे (Food) सेवन करा. व्हिटॅमिन-ए, डी, ई, ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स समृद्ध असलेल्या गोष्टी तुमच्या आहारात असणे आवश्यक आहे. यापैकी व्हिटॅमिन सी सर्वात महत्वाचे आहे. यामुळे त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढते आणि त्वचेची सैल होण्याची समस्या दूर होते.

Facial Care
World Mental Health 2022 : आहारात 'हे' पदार्थ नसतील तर, कमजोर होऊ शकते मेंदूचे आरोग्य !

त्वचेची मालिश -

Facial Massage
Facial MassageCanva

वाढत्या वयाबरोबर त्वचा सैल होऊ लागते, त्यामुळे चेहऱ्याला मसाज करणे हा प्रभावी उपाय आहे. यामुळे त्वचा टाइट आणि हायड्रेटही राहते. चेहऱ्याच्या मसाजसाठी तुम्ही नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता.

भरपूर झोप घ्या -

Sleep
SleepCanva

त्वचेची चमक टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या आहारासोबत पुरेशी झोप घेणेही खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे रात्री किमान ७-८ तासांची झोप घ्या.

तणावही कमी घ्या -

Stress
StressCanva

जास्त ताण घेतल्याने केस गळतातच शिवाय त्वचेवरही परिणाम होतो. यामुळे तणाव घेणे देखील टाळा. पुरेसे पाणी प्या. तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाची मदत घ्या.

स्क्रबिंगही करा -

Scrub
Scrub Canva

आठवड्यातून एकदा त्वचा स्क्रबिंग करा. यासाठी साखर आणि ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. स्क्रबिंगनंतर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड वेरा जेलचा वापर हा देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

Facial Care
World Mental Health Day: मानसिक आरोग्य उत्तम राखायचे आहे ? तर 'या' टिप्स फॉलो करा, चिंता आणि नैराश्यापासून राहाल दूर

व्यायाम -

Exercise
ExerciseCanva

नियमितपणे व्यायाम केल्याने मूड ताजेतवाने होतो, तणाव कमी होतो आणि तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होते, ज्यामुळे तुम्हाला पुरेशी झोप मिळते. व्यायामामुळे नैराश्य आणि चिंताही कमी होते. व्यायामशाळेत जाण्याऐवजी, आपण शरीराची हालचाल आणि स्ट्रेचिंग घरी किंवा पार्कमध्ये देखील करू शकता.

विश्रांती घेणे -

Rest
RestCanva

उच्च दाब आणि वेगवान धावण्याच्या जगात जगत आहोत. तुमच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढा आणि मन आणि शरीर ताजेतवाने करण्याची संधी द्या.

सकारात्मकता मानसिक आरोग्यासाठी -

Mental Positivity Health
Mental Positivity Health Canva

चांगल्या सकारात्मक मानसिक आरोग्यासाठी नेहमी सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. सकारात्मकतेमुळे तुमचा मूडही सुधारेल आणि तुम्ही नैराश्यासारख्या मानसिक आजारापासून दूर राहाल.

निरोगी आहार -

Health Diet
Health DietCanva

मानसिक आरोग्य आणि अन्न यांचा थेट संबंध आहे. आपल्या शरीरातून बाहेर पडणारे बहुतेक सेरोटोनिन संप्रेरक हे आतड्याच्या न्यूरोट्रांसमीटरमधून येतात. चांगल्या आहाराने आपण नैराश्यापासून दूर राहू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com