Monsoon Bike Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Bike Care Tips : मुसळधार पावसात बाईक बंद पडण्याचा धोका, अशी घ्या गाडीची काळजी

Bike Maintenance Tips During Monsoon : पावसाळ्यात मोटारसायकलची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Maintain Your Two Wheeler In The Rainy Season : सध्या देशात जवळपास सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे रस्तेही झपाट्याने खराब होत आहेत, तर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, ज्याचा थेट परिणाम वाहनांवर होत आहे. त्यामुळेच पावसाळ्यात मोटारसायकलची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाच्यासाठी बाईक मेन्टेनन्सच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत.

पार्किंग करताना लक्ष द्या

अनेकजण मोकळ्या जागी मोटारसायकल (Motorcycle) पार्क करतात, तसेच अनेक दिवस पाऊस पडत असल्याने बाइकच्या काही ठिकाणी गंज निर्माण होतो, त्यामुळे दुचाकीचे बरेच नुकसान होते. म्हणूनच बाइक नेहमी शेडच्या खाली पार्क करण्याचा सल्ला दिला जातो किंवा ती उपलब्ध नसल्यास, बाईक कव्हर वापरण्याचा सल्ला दिला जातो.

बॉडी वर्क प्रोटेक्शन

बाइकचा रंग सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही लॅमिनेशन किंवा कोटिंग करू शकता. यामुळे तुमच्या बाइकची चमक बराच काळ टिकून राहते.

टायरची देखभाल

बाइकचा (Bike) सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा टायर. चिखलाच्या ठिकाणी दुचाकीवरून घसरून अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर येतात, त्यामुळे टायरची थ्रेड वेळीच तपासा, तो खराब झाला असेल तर तो त्वरित बदलून घ्या.

ब्रेक्सची काळजी घ्या

पावसाळ्यात बाइकवर जास्त पाणी (Water) पडल्यामुळे ब्रेकिंग सिस्टीम खराब होते किंवा मजबूत ब्रेकिंग क्वालिटी उपलब्ध नसते. अशा परिस्थितीत, या हवामानात बाइक बाहेर काढताना ब्रेक तपासण्याचा सल्ला दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT