Relationship Tips Saam TV
लाईफस्टाईल

Relationship Tips : मनापासून खरं प्रेम करत असाल, तरी सुद्धा 'या' चुकांमुळे होईल ब्रेकअप; वेळीच सुधारा

Relationship Mistakes : नातं संपल्यावर देखील अनेक कपल्सला यातून बाहेर पडणे फार कठीण होतं. कारण त्यांचं त्यांच्या पार्टनरवर जीवापाड प्रेम असतं.

Ruchika Jadhav

ब्रेकअप होणे प्रत्येक व्यक्तीसाठी दुखद गोष्ट असते. नात्यात होणारे वाद आणि गैरसमज यांमुळे दोघांच्या मनात एकमेकांविषयी राग निर्माण होतो आणि ते नातं संपण्याच्या वाटेवर जातं. एक दिवस वाद वाढल्याने या नात्याचा अखेर अंत होतो. नातं संपल्यावर देखील अनेक कपल्सला यातून बाहेर पडणे फार कठीण होतं. कारण त्यांचं त्यांच्या पार्टनरवर जीवापाड प्रेम असतं.

काही कपल्स दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. मात्र त्यांना एकमेकांची साथ कायम देता येत नाही. वेगळे विचार असल्याने दोघांमध्ये सतत वाद होतात. हे वाद इतके वाढतात की एकत्र राहण्यापेक्षा वेगळं झालेलं चागलं अशी भावना दोघांच्याही मनात निर्माण होते. आता तुमचं नात सुद्धा अशा काही कारणांनी संपण्याच्या वाटेवर असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रियकराला गमवायचं नसेल तर पुढील गोष्टी फॉलो करा.

एकमेकांमध्ये बदल घडवणे

प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा स्वभाव असतो. आपल्या स्वभावानुसार व्यक्ती वागतो. आता आपल्या आवडच्या व्यक्तीने परफेक्ट आणि आपल्याला आवडतं तसंच असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र प्रत्यक्षात ते शक्य नाही. त्यामुळे कोणीही असा विचार करणे चूक आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याचा त्यांना त्रास होतो आणि प्रेमाच्या नात्यात दडपन जाणवू लागतं.

ब्लेम करणं बंद करा

प्रत्येक नात्तात जिथे प्रेम आहे तिथे वाद आणि भांडणं सुद्धा होतात. तसेच प्रत्येक व्यक्ती कितीही चांगली असली तरी नकळत हातून काही ना काही चूका होतातच. झालेल्या चुकांमुळे नात्यात वाद होतात. अशावेळी स्वत:ची चूक ओळखून लगेचच माफी मागितली पाहिजे. माफी मागण्याआधी काही जण आपल्या पार्टनरने आधी केलेल्या जुन्या चूका उकरून काढतात आणि ब्लेम करतात. असे केल्याने पार्टनरच्या मनातून तु्म्ही हळूहळू उतरून जाल.

भांडण झाल्यावर ते लवकर न मिटवणे

प्रत्येकाला स्वत:ची एक सेल्फ रिस्पेक्ट असते. वादात आपण एकमेकांवर आरोप करतो किंवा एकमेकांच्या चूका शोधत राहतो. मात्र कधी कधी भांडण जास्त वाढतं. आता या भांडणामुळे नातं संपण्याआधी सावध होणं गरजेचं असतं. त्यासाठी आपली सेल्फ रिस्पेक्ट किंवा इगो बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीचा स्विकार करावा लागतो. कारण वादात व्यक्ती रागात असतो, त्यामुळे रागात तुमच्या भावना दुखावलेल्या असतात. वाद शांत झाल्यावर समोरच्या व्यक्तीला अनेकदा आपण काय बोललो होतो हे सुद्धा आवठत नाही. त्यामुळे विषय न ताणता लवकर मिटवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

SCROLL FOR NEXT