Share Market | शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1500 अंकांची घसरण  Saam Tv
लाईफस्टाईल

Share Market | शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 1500 अंकांची घसरण

भारतीय शेअर मार्केटची सुरुवात अतिशय नकारात्मक झाली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतीय शेअर मार्केटची (Share Market) सुरुवात अतिशय नकारात्मक झाली आहे. शेअर बाजारमध्ये (Share Market) जवळपास १५०० अंकांची घसरण झाली आहे. जागतिक शेअर बाजारात (Share Market) घसरण असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय देशांतर्गत कारणांचे शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. (Big fall in the stock market)

हे देखील पहा-

सकाळी ९.१८ वाजेच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1१२३१.६६ अंकांची म्हणजे २.१२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर, निफ्टी २९८.६० अंक म्हणजे जवळपास १.७२ टक्क्यांनी घसरण झाली आहे. शेअर बाजारात इतर घटकांचा परिणाम होत असतो. या शिपिंग घोटाळ्याचा परिणाम बँक निफ्टीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय जागतिक शेअर बाजारामध्ये देखील घसरण दिसून आली आहे. SGX हा १.५ टक्क्यांनी घसरला आहे.

अमेरिकेमधील (United States) महागाई, युक्रेन तणावासह अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्यासह इतर ४ जणांवर सेबीने शेअर बाजारामध्ये व्यवहार करण्यास केलेल्या मनाईचा देखील परिणाम बाजार व्यवहारावर होऊ शकणार आहे. मागील काही दिवसांपासून सतत अस्थिर असलेल्या शेअर बाजारात सोमवारच्या व्यवहारावर ABG शिपयार्ड घोटाळ्याचे सावट आहे. ABG शिपयार्डने तब्बल २८ बँकांना २२,८४२ कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याचा परिणाम शेअर बाजारावर होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog 2025: शु्क्रादित्य राजयोग ३ राशींना करणार मालामाल; व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी मिळणार मदत

Success Story: शाळेत गोल्ड मेडल, सिविल इंजिनियरिंग केलं,नंतर UPSC क्रॅक; IPS सृष्टी गुप्ता यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुढील ३ दिवस नाशिकला पावसाचा यलो अलर्ट

Rahu Gochar 2026: राहूच्या गोचरमुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; प्रत्येक कामातून हाती येणार पैसा

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

SCROLL FOR NEXT