HSC- SSC Exam: दहावी- बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात; आजपासून प्रात्यक्षिक परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
HSC- SSC Exam: दहावी- बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात; आजपासून प्रात्यक्षिक परीक्षा
HSC- SSC Exam: दहावी- बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात; आजपासून प्रात्यक्षिक परीक्षाSaam Tv
Published On

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने १० वी (SSC Exam) आणि १२ वीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. १० वी आणि १२ वी परीक्षाकरिता (HSC Exam) बोर्डाकडून तयारी करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे यावेळी परीक्षा केंद्र वाढवण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी शाळा तिथे केंद्र अशी व्यवस्था करण्यात येत आहे. बोर्डाने मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे १२ वीच्या प्रात्याक्षिक परीक्षा आजपासून सुरु आहेत. शाळा व्यवस्थापनांच्या वतीने प्रात्याक्षिक परीक्षाविषयी करण्यात आलेले असहकार आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मात्र, लेखी परीक्षेवर असलेले संकट अद्याप कायम आहे. (Preparation for 10th and 12th exams is in final stage)

हे देखील पहा-

१० वी आणि १२ वीची परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने मुख्याध्यापक महामंडळाची बैठक घेतली आहे. यावर्षी शाळा तिथे केंद्र असल्यामुळे बोर्डाने मार्गदर्शक सूचना जारी केले आहेत. कोरोना नियमाचे तंतोतंत पालन करा, असे आदेश बोर्डाकडून देण्यात आले आहेत. परीक्षेच्या दरम्यान बोर्डाकडून लागेल ती मदत पुरवली जाणार आहे. परीक्षा व्यवस्थित पार पाडा, असे आदेश बोर्डाकडून महामंडळाला देण्यात आले आहेत. केंद्रावर पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. यंदा जवळपास ३१ लाख विद्यार्थी १० वी आणि १२ वीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे बोर्डाकडून जोरातच तयारी करण्यात येत आहे. (Preparation for 10th and 12th exams is in final stage)

प्रात्याक्षिक परीक्षांवर असलेले संकट टळले

राज्य मंडळाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर असलेले संकट टळले आहे. संस्थाचालक महामंडळाने असहकार आंदोलन मागे घेतले आहे. तर राज्य सरकारशी चर्चा केल्यावर संघटनेने परीक्षेवर असलेले बहिष्कार मागे घेतला आहे. यामुळे आजपासून होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षांवर असलेले संकट टळले आहे. पण, लेखी परीक्षांवरील संकट अद्याप संपले नाही. मागील अनेक वर्षांपासून शाळांना वेतनेतर अनुदान मिळाले नसल्यामुळे संस्थाचालक महामंडळाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

HSC- SSC Exam: दहावी- बारावीच्या परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात; आजपासून प्रात्यक्षिक परीक्षा
Assembly Elections 2022: युपी, गोवा, उत्तराखंडमध्ये आज मतदान दिग्गज मैदानात

१२ वीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा आजपासून सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून १२ वीच्या परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत. तर प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च मध्ये होत आहेत. कोरोना आणि इतर कारणाने अडचण आल्यास ३१ मार्च ते १८ एप्रिल या काळात प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात परीक्षेकरिता कोरोनोमुळे मंडळ परीक्षा शुल्क आकारणार नाही. १० वीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीमध्ये परीक्षा होणार आहे. काही कारणाने परीक्षा देता आली नाही, तर ५ एप्रिल ते २२ एप्रिल पर्यंत होणार आहेत. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळात होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com