Bharat Series Number Plate Saam Tv
लाईफस्टाईल

Bharat Series : भारत सीरीज नंबर प्लेटची कार खरेदी केल्यास फायदा होता का? हा नंबर कोणाला मिळतो?

BH Series: भारत सीरीज नंबर प्लेट घेतल्याने खूप फायदा होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BH Series Number Plate :

भारतात प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या नंबर प्लेट असतात. त्यामुळे जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे असेल तर तुम्हाला कारचा नंबर बदलावा लागतो. या कामात खूप जास्त वेळ जातो. त्यामुळे सरकारने भारत सीरीज सुरू केली आहे. BH नंबर प्लेट घेतल्याने तुम्हाला कोणत्याही राज्यात गेल्यावर नंबरप्लेट बदलण्याची गरज पडणार नाही.

तुम्हाला जर कामासाठी दोन राज्यांत प्रवास करावा लागत असेल तर BH नंबर प्लेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. सध्या ज्या नंबर प्लेट दिल्या जातात. त्या राज्यांच्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार दिल्या जातात. त्यामुळे BH नंबर प्लेट वापरल्यास तुम्हाला नेहमी कारचा नंबर बदलण्याची गरज पडणार नाही.

देशातील संरक्षण कर्मचारी, राज्य सरकारचे कर्मचारी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्यासाठी BH सीरीज सुरू करण्यात आली आहे. याचसोबत खासगी कंपन्यांचे कर्मचारीदेखील हा रजिस्ट्रेशन नंबर घेऊ शकतात. ज्यांचे ऑफिस वेगवेगळ्या राज्यात आहेत. ते लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय कार दुसऱ्या राज्यात नेऊ शकतात.

भारत सीरीज नंबर प्लेट

भारत सीरीज हे एक विशेष प्रकारचे रजिस्ट्रेशन आहे. जसं एक राज्य, एक रेशन कार्ड सारख एक राज्य, एक नंबर प्लेट अशी सीरीज आहे. या सीरीजमधील वाहनांच्या नंबर प्लेट 21, 22, 23 अंकांनी सुरू होतात. यावरुन वाहनाचे रजिस्ट्रेशन कधी झाले हे कळते. यात राज्य कोडच्या जागी BH लिहलं जातं. ही नंबर प्लेट संपूर्ण देशभरात आहे.

BH नंबर प्लेट YY BH #### XX स्वरुपात असते. यातील पहिल्या दोन संख्या नोंदणीच्या वर्षासाठी लिहलेल्या असतात. यानंतर BH सीरीज कोड नंबर येतो. हा नंबर चार अंकी असतो. शेवटची दोन अक्षरे वेगळी असतात. वाहनांमध्ये बसवलेल्या नंबर प्लेटवरुन BH सीरीजची वाहने ओळखली जातात.

BH नंबरप्लेट मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT