Cyber Fraud Saam Tv
लाईफस्टाईल

Cyber Fraud : 'हॅलो, पोलीस स्टेशनमधून बोलतोय...' तुम्हालाही असा कॉल आला तर सावध व्हा; या चूका करु नका

Beware Of Police Phone Call Scams : सध्या असाच एक स्कॅम सध्या चर्चेत आहे. ज्यात पोलीसांचे नाव पुढे करुन स्कॅमर्स सामान्य लोकांना धमकावून पैशांची मागणी करतात. हा घोटाळा नेमका कसा होतो? असा फोन आल्यानंतर आपण काय करावे? जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

Cyber Crime :

वाढत्या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग इंटरनेटच्या जाळ्यात अडकले आहे. इंटरनेटमुळे आपल्याला अधिक फायदा होतो. परंतु, याच इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे आपल्यासोबत फ्रॉड होऊ शकतो.

तंत्रज्ञानामुळे अनेक समस्याही निर्माण होत आहेत. सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. घोटाळेबाज लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन स्कॅम शोधून काढत आहे. सध्या असाच एक स्कॅम (Scam) सध्या चर्चेत आहे. ज्यात पोलीसांचे नाव पुढे करुन स्कॅमर्स सामान्य लोकांना धमकावून पैशांची (Money) मागणी करतात. हा घोटाळा नेमका कसा होतो? असा फोन आल्यानंतर आपण काय करावे? जाणून घेऊया

1. काय आहे नवा स्कॅम

स्कॅमर्स लोकांनी फसवणूक (Fraud) करण्याचा नवा मार्ग शोधला आहे. यामध्ये पोलिस असल्याचे सांगून किंवा पोलिस ठाण्यातून बोलत आहोत असे सांगतात. इतकेच नाही तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला पकडले गेले आहे असे सांगतात. पैसे पाठवल्यास सोडून देऊ असे सांगतात. अशा वेळी बरेच लोक घाबरुन पैसे ट्रान्सफर करतात. यामुळे आपण सायबर फ्रॉडला बळी पडतो.

2. कॉल्स येतात कुठून?

हे कॉल्स आपल्याला व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून येतात. पोलिसांचा बनावट असा फोटो वापरुन ते अनेकांना घाबरवतात. अशावेळी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवायला हवे.

3. या टिप्स लक्षात ठेवा.

1. फोन करणाऱ्याची माहिती

पोलिस स्टेशनमधून तुम्हाला फोन आला असेल तर त्या व्यक्तींची संपूर्ण माहिती मिळवा. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल आणि पोलिस स्टेशनबद्दल विचारा. ज्या व्यक्तीचे नाव घेऊन आपल्याला कॉल आला आहे त्या व्यक्तीला विचारा.

2. वैयक्तिक माहिती

कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका. तसेच फोनवर आलेला OTP मागितला तर दुर्लक्ष करा.

3. ब्लॉक करा

जर तुम्हाला कॉल आला किंवा काही संशयास्पद वाटले तर सायबर पोलिस स्टेशन किंवा जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT