Yoga For Women Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga For Women : महिलांनो, वयाची तिशी ओलांडल्यानंतर फिट राहायचे आहे? ही ४ योगासने नियमित कराच!

Yoga Benefits : योग ही आजच्या जीवनशैलीची गरज आहे, अनेक रोगांवर योगाने मात करता येते.

कोमल दामुद्रे

Best Yoga Poses For Women In Their 30's :

वयाच्या ३० शी ओलांडल्यानंतर महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण शरीराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे शरीराचे नुकसान होते. त्यामुळे वाढत्या वयात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

योग ही आजच्या जीवनशैलीची गरज आहे, अनेक रोगांवर योगाने मात करता येते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते, शक्ती वाढते, हाडे व स्नायू मजबूत होतात, शरीर लवचिक होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वयाच्या ३० शी ओलांडल्यानंतर महिलांना आरोग्य (Health) निरोगी राखण्यासाठी महिलांना दररोज योग (Yoga) करायला हवे. वाढत्या वयाबरोबर स्त्रियांमध्ये हाडे आणि स्नायूंवर परिणाम होतो. त्यासाठी महिलांनी नियमितपणे ही ४ योगासने करायला हवी.

1. वीरभद्रासन

या आसनामुळे मांड्या आणि खांद्याचा स्नायू मजबूत होतो. तसेच पोट (Stomach) कमी करण्यास मदत करते. या आसनामुळे बॉडी फिट राहाते.

2. त्रिकोनासन

त्रिकोनासन म्हणजे तीन कोन असलेली मुद्रा. या दरम्यान शरीराच्या स्नायूंवर ताण पडतो. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. पोट आणि कमरेची चरबी कमी होते. तसेच स्नायू मजबूत होतात.

3. अधोमुखश्वानासन

या योगासनामध्ये शरीर उलट्या V पोझमध्ये येते. यामुळे संपूर्ण शरीराला वेगळा टोन मिळतो. रक्ताभिसरण वाढवून शरीराला ऊर्जा मिळते. एकाग्रता वाढते. शरीराचे संतुलन सुधारते.

4. सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कार केल्याने स्नायू बळकट होतात. रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम मिळतो. यामुळे कंबर आणि हातांचा टोन सुधारण्यास मदत होते. पचनसंस्था मजबूत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT