Diwali Vacation SAAM TV
लाईफस्टाईल

Diwali Vacation : काय झाडी काय डोंगर...दिवाळीत बनेल बेस्ट पिकनिक प्लान, सापुताऱ्यात आहेत झकास भटकंतीचे स्पॉट्स

Saputara : दिवाळीची मोठी सुट्टी आनंदात घालवण्यासाठी भारतातील 'या' विंटर लोकेशनला आवर्जून भेट द्या. कमी खर्चात जास्त मजा मिळेल आणि मूडही फ्रेश राहील.

Shreya Maskar

दिवाळीत (Diwali ) कामापासून आणि मुंबईच्या धावपळीच्या जगातून ब्रेक घ्या आणि महाराष्ट्रात भटकंती करा. दिवाळीची सुट्टी आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत मस्त एन्जॉय करा. हिरवेगार पर्वत आणि निसर्गाचा सौंदर्य अनुभवायचे असेल तर गुजरात मधील सापुतारा हिल स्टेशनला भेट द्या. हे हिल स्टेशन गुजरात मधील डांग जिल्ह्यात वसलेले आहे. शांत वातावरण, निसर्गाचा अद्भूत नजारा येथे पाहायला मिळतो. स्वर्गाहून सुंदर असे हे शिखर आहे.

सापुतारा तलाव

सापुतारा (Saputara) तलाव हे सापुतारा हिल स्टेशनपासून सुमारे 1.5 किमी अंतरावर आहे. हे सापुतारामधील सर्वात प्रसिद्ध पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते. हिरवेगार हे मानवनिर्मित तलाव बोटिंगसाठी लोकप्रिय आहे. या परिसरात मुलांसाठी अनेक उद्याने आहेत. तलावाच्या बाजूने पर्यटकांसाठी भरपूर फूड स्टॉल्स आणि शॉपिंग क्षेत्रे आहेत ज्यामुळे येथे फिरायला मजा येते.

व्हॅली व्ह्यू पॉईंट

व्हॅली व्ह्यू पॉईंट हा सनराइज पॉईंट म्हणूनही प्रसिद्ध आहे. ट्रेकिंग करून तुम्ही या ठिकाणी पोहचू शकता. येथून हिरव्यागार जंगलांचे एक सुंदर दृश्य दिसते. हे पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे. या शिखरावरून सूर्योदयाचे मनमोहक दृश्य पहाटे पाहता येते. यासाठी पर्यटक येथे आवर्जून येतात.

नागेश्वर महादेव मंदिर

नागेश्वर महादेव मंदिर एक प्राचीन शिव मंदिर आहे. हे मंदिर सुंदर सापुतारा तलावाच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावर वसलेले आहे. नागेश्वर महादेव मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराला लेक गार्डन जोडलेले आहे. हे शांत आणि स्वच्छ मंदिर आहे. आध्यात्मिक वातावरणाचा सुरेख अनुभव येथे घेता येतो.

हतगड किल्ला

हतगड किल्ला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला आहे. नाशिक-सापुतारा रोडवर हतगड गावापासून हातगड किल्ला जवळ आहे. हा किल्ला सुमारे 3600 फूट उंच आहे. ट्रेकिंग करून तुम्ही या ठिकाणी पोहचू शकता. सापुताऱ्यातील फिरण्यासाठी हे उतम ठिकाण आहे .नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर येथे हा प्राचीन किल्ला सह्याद्रीच्या रांगेत आहे. येथून गंगा आणि यमुना नद्याचे जलाशय पाहायला मिळतात. या किल्ल्यावरून सापुताराचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT