पावसाळ्यातील नयनरम्य दृश्यांचा अनुभव घेण्यासाठी चिपळूण शहर एक उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील चिपळूण तालुका रत्नागिरी जिल्ह्यात आहे. चिपळूण शहर एक सुंदर शहर असून त्याच्या निसर्ग सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. पर्यटक पावसाळ्याच्या महिन्यात येऊन चिपळूनमधील तळे, बागा, मंदिरे, आणि ऐतिहासिक इतिहास यांसारख्या अनेक गोष्टींना भेट देऊ शकता. निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी हे फार योग्य ठिकाण आहे. लाखो पर्यटक मोठ्या संख्येने चिपळून शहराला भेट देण्यासाठी येत असतात. जर तुम्ही सुद्धा पावसाळ्यात चिपळूण शहराला भेट देण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार उपयोगी आहे. तुम्हाला चिपळूनमधील पर्यटन स्थळांची माहिती मिळून तुमचा चिपळूण प्रवास अगदी अविस्मरणीय ठरणार आहे.
परशुराम मंदिर
चिपळूण तालुक्यातील परशुराम मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक मंदिर आहे. परशुराम मंदिर भगवान परशुराम यांना समर्पित आहे. परशुरामाला भगवान विष्णूचे अवतार मानले जाते. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने येथे आल्यावर भाविकांना प्रसन्न वाटत असते. परशुराम मंदिर एक उत्तम पर्यटन स्थळ असल्याने लाखो पर्यटक मोठ्या संख्येने या मंदिराला भेट देण्यासाटी येत असतात.
वाशिष्ठी नदी
वाशिष्ठी नदी चिपळूण शहराचा एक सौंदर्यपूर्ण अविभाज्य भाग आहे. पर्यटकांना वाशिष्ठी नदीला भेट दिल्यावर बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. त्याचबरोबर पर्यटकांना वाशिष्ठी नदीला भेट दिल्यावर अनेक पिकनिक स्पॅाटला सुद्धा भेट देता येणार आहे. वाशिष्ठ नदी तिच्या शांततेमुळे आणि हिरव्यागार वातावरणामुळे सर्वांना आकर्षित करत असते. सुट्टीच्या दिवशी वाशिष्ठी नदीला भेट दिल्यावर तुम्ही तुमच्या मित्र- परिवारासोबत आनंदाने एन्जॅाय करु शकता.
मार्लेश्वर मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मार्लेश्वर नावाचे प्राचीन शिवमंदिर आहे. चिपळूण शहरापासून मार्लेश्वर मंदिर ६० किमी अंतरावर आहे. पर्यटकांना मार्लेश्वर मंदिर डोंगराच्या उच्च ठिकाणी स्थित असल्यामुळे सर्व भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. पर्यटकांना त्याबरोबर मार्लेश्वरचे निसर्गरम्य दृश्य, जंगल आणि शांतता अनुभवता येणार आहे. मंदिराच्या बाजूने दरीतून वाहणारा धबधबा पर्यटकांना पाहायला मिळणार आहे.
गोवळकोट किल्ला
चिपळूण जवळील गोवळकोट किल्ला मराठा साम्राज्याशी संबंधित आहे. गोवळकोट किल्ला एक ऐतिहासिक वारसा असून हा किल्ला वाशिष्ठी नदीच्या काठी वसलेला आहे. पर्यटकांना गोवळकोट किल्याला भेट देताना वाशिष्ठी नदीचे आणि हिरव्यागार डोंगराचे अतिशय सुंदर दृश्य पाहता येणार आहे. इतिहासप्रेमी पर्यटकांसाठी गोवळकोट किल्ला एक उत्तम ठिकाण आहे. गोवळकोट किल्याची रचना आणि किल्याचे ऐतिहासिक महत्त्व पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्याबरोबर पर्यटकांना सूर्योदय आणि सूर्यास्ताचे अंत्यत सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे.