ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला बाहेरच्या निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असतो.
रोजच्या धावपळीच्या जीवनातून नागरिकांना फिरण्यासाठी वेळ मिळत नाही.
अशाच पर्यटकांसाठी मुंबईतील काही हिल स्टेशनची माहिती घेऊन आलो आहोत. यामुळे त्यांना मुंबईतील निसर्गाचा सुंदर क्षण अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्रातील कर्जत मुंबई शहरापासून ६३ किमी अंतरावर आहे. कर्जतमध्ये पर्यटकांना हिरवेगार डोंगर, जंगल, तलाव, नद्या, आणि धबधबे पाहायला मिळणार आहेत.
पावसाळ्यात रंधा धबधबा त्याच्या अलौकिक दृश्यामुळे पर्यटकांना आकर्षित करत असतो. हा धबधबा मुंबईपासून १६५ किलोमीटर अंतरावर आहे.
पांडवकडा धबधबा नवी मुंबईच्या खारघर परिसरात आहे. हा धबधबा सुमारे १०७ मीटर उंचीचा आहे. हा एक प्रसिद्ध धबधबा असून महाभारतातील पाच पांडवानी येथे स्नान केले होते.
पावसाळ्यातील माळशेज घाट धबधबा त्याच्या सुंदर प्रवाहामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतो. माळशेज धबधबा पर्यटकांसाठी एक उत्तम पिकनिक स्पॅाट आहे.
महाराष्ट्रातील धोबी धबधबा नैसर्गिक सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. हा धबधबा सुट्टीसाठी लोकप्रिय पर्यटन स्थळ असून तुम्ही आपल्या प्रियजनांसोबत येथे वेळ स्पेन्ड करु शकता.
NEXT: आनंदी राहण्यासाठी करा 'या' टीप्स फॉलो