Pune Travel SAAM TV
लाईफस्टाईल

Pune Travel : पुण्यात मान्सून ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन, कमी खर्चात मजा होईल दुप्पट

Monsoon Trekking : पुण्यात फिरण्याचा प्लान करत असाल तर, पुणे मान्सून ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. पावसाळ्यात पुण्याचे सौंदर्य खुलून येते. त्यामुळे पुण्यातील 'या' निसर्गरम्य ठिकाणांना आवर्जून भेट द्या.

Shreya Maskar

मुंबईपासून पुणे शहर हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत वीकेंडला ट्रेक प्लान करू शकता. पावसाळ्यात पुणे शहराचे सौंदर्य मनाला भुरळ पाडते. पुण्याला ऐतिहासिक वारसा आहे. संस्कृती आणि विविधतेने नटलेल्या पुणे शहराला पावसात आवर्जून भेट द्या. पुणे मुंबईजवळ असल्यामुळे तुमची पुणे ट्रिप स्वस्तात मस्त होईल आणि तुम्हाला मनसोक्त आनंद घेता येईल.

सिंहगड

पुण्यातील सिंहगड ट्रेकिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पूर्व दिशेला सिंहगड किल्ला आहे. या गडावरून पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड इत्यादी किल्ले दिसतात. हा ट्रेक कात्रज बोगद्याच्या माथ्यावरून सुरू होऊन सिंहगड किल्ल्यावर संपतो. हा ट्रेक डोंगराळ आहे. पावसाळ्यात येथे ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर स्वतःची विशेष काळजी घ्यावी. सिंहगडावरून पुणे शहराचे अद्भूत रूप पाहायला मिळते.

मढे घाट

मढे घाट हा पुण्यातील प्रसिद्द घाट आहे. पर्यटकांचे हे आकर्षण आहे. तसेच मढे घाटातून ट्रेकिंग करत तुम्ही उपांड्या घाटावर पोहचू शकता. पावसाळ्यात या घाटाचे सौंदर्य आणखी खुलून येते. मढे घाटावरून तुम्हाला तोरणा आणि रायगड किल्ला नजरेस पडतो. मढे घाट वरील धबधबा पावसाळ्यात पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव होय.

लेण्याद्री

लेण्याद्री हे पुण्यातील कलात्मक ठिकाण आहे. येथे तुम्हाला बौद्ध लेणी पाहायला मिळतील. येथे तुम्हाला लांब पसरलेला डोंगर रांगा पाहायला मिळतील. तसेच येथे तुम्हाला शिलालेख देखील पाहायला मिळतील. येथे तुम्ही छोटा ट्रेक करून जाऊ शकता. लेण्याद्रीला ट्रेकिंगसोबत देवदर्शनाचा आनंदही घेता येतो. जुन्या काळातील बांधकामाचा हा उत्तम नमुना आहे. तसेच हे फोटोग्राफीसाठी देखील उत्तम ठिकाण आहे. लेण्याद्री पुण्यातील कुकडी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाटापर्यंत पोहचताना तुमचा छान ट्रेक होतो. हा ट्रेक मुळशी धरणापासून सुरू होऊन ताम्हिणी घाटावर संपतो. हा घाट कोकण आणि पुण्याला जोडतो. येथे तुम्हाला चहूबाजूला हिरवळ आणि जवळ धबधबे पाहायला मिळतात.

राजमाची

राजमाची गाव पुण्यातील सर्वात सुंदर ठिकाण आहे. हा संपूर्ण खडकाळ प्रदेश आहे. येथे असलेला किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट ठिकाण आहे. तसेच हे ठिकाण लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे पर्यटक मोठ्या संख्येने फोटोग्राफी करताना दिसतात. विविध जातीचे पक्षी आणि प्राणी येथे पाहायला मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Bhaubeej Gift: अजून ठरलं नाही बहिणीसाठी गिफ्ट? पाहा भाऊबीजासाठी खास आणि ट्रेंडी गिफ्ट Ideas

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

SCROLL FOR NEXT