Udaipur Travel  SAAM TV
लाईफस्टाईल

Udaipur Place To Visit: सुट्टीत राजेशाही थाट अनुभवा, उदयपूर मधील 'या' निसर्गरम्य ठिकाणांची सफर करा..

Udaipur Travel Destination: पावसात सुट्टीमध्ये मस्त फिरण्याचा प्लान करत असाल तर राजेशाही थाटा अनुभवायला राजस्थानची शान उदयपूरला आवर्जून भेट द्या.

Shreya Maskar

उदयपूर ही मेवाड साम्राज्याची राजधानी आहे. भारतातील राजस्थानमधील हे एक सुंदर शहर आहे. हे शहर येथील इतिहास आणि वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध आहे. उदयपूर मधील सुंदर तलाव पर्यटनाचे आकर्षण आहे. उदयपूर भव्य राजमहाल, राजेशाही थाटा, पराक्रमी राजा आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी ओळखले जाते. अशा कलाप्रेमी आणि निसर्गाने नटलेल्या उदयपूर मधील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या.

सिटी पॅलेस

सिटी पॅलेस उदयपूरची शान आहे. हा राजवाडा मेवाड राजघराण्याच्या काळात बांधण्यात आला. शिल्पकलेचे अनेक उत्तम नमुने तुम्हाला येथे पाहत येतील. सुंदर बाल्कनी हे या पॅलेसचे आकर्षण आहे.

बागोर-की-हवेली

बागोर-की-हवेली उदयपूरच्या गणगौर घाट मार्गावर आहे. ही हवेली असंख्य शिल्पे, भित्तिचित्रे, आणि आरशाची कामे यांसाठी प्रसिद्ध आहेत. या हवेलीत राजस्थानी नृत्याचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.

सज्जनगड मान्सून पॅलेस

सज्जनगड मान्सून पॅलेस हे उदयपूरमधील टेकडीवर वसलेले आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. पावसात पर्यटक येथे आवर्जून येतात. दरी आणि टेकड्यांचे विलक्षण दृश्य सज्जनगड मान्सून पॅलेसमधून पाहायला मिळते.

पिछोला तलाव

उदयपूरमधील सर्वात लोकप्रिय ठिकाण म्हणजे पिछोला तलाव. या तलावातून अरवलीचे सुंदर दृश्य पाहता येते. पिछोला तलाव उदयपूरमधील सर्वात मोठे तलाव आहे.

अहार संग्रहालय

अहार संग्रहालय पश्चिम भारतातील प्राचीन वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. उदयपूरची संस्कृती, साहित्य आणि कला याचा उत्तम नमुने अहर संग्रहालयात पाहायला मिळतात.

ताज लेक पॅलेस

ताज लेक पॅलेस हे उदयपूरचे आकर्षण आहे. पर्यटक उदयपूरला आल्यावर येथे आवर्जून भेट देतात. हा पॅलेस पिछोला तलावा शेजारी आहे. या पॅलेसच्या आजूबाजूचा परिसर सुंदर आहे. सूर्यास्त पाहण्याचा सुरेख अनुभव येथे घेता येतो. अनेक जुन्या चित्रपटांचे शूटिंग येथे झाले आहे.

दूध तलाई तलाव

दूध तलाई तलाव हे क्रियाकलाप आणि बोटिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. हा तलाव शांत आहे. येथे तुम्ही उंट आणि घोडेस्वारी करू शकता. सूर्यास्ताचे सुरेख दृश्य येथे तुम्हाला पाहायला मिळेल.

जगदीश मंदिर

जगदीश मंदिर हे उदयपूरमधील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. जगदीश मंदिर हे भगवान विष्णूचे मंदिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT