Nalasopara Picnic Spot SAAM TV
लाईफस्टाईल

Nalasopara Picnic Spot : हा सागरी किनारा... निसर्गाच्या सानिध्यात लपलेत नालासोपाऱ्यातील पिकनिक स्पॉट्स

Shreya Maskar

आणि आपला मूड फ्रेश करा. थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवल्यावर तुमच्या मनाला आनंद मिळेल. तसेच या पिकनिक स्पॉट्सना तुम्ही कधीही भेट देऊ शकता. मात्र पावसाळा आणि हिवाळ्यात यांचे सौंदर्य आणखी वाढते.

नालासोपारा (Nalasopara ) हे मुंबईच्या उत्तरेस असलेले ठिकाण आहे. हे लोकेशन वसई-विरार अंतर्गत येते. नालासोपाऱ्याला पोहचण्यासाठी तुम्ही वेस्टन लाईनवरून रेल्वेने प्रवास करू शकता. कमी खर्चात हा प्रवास होतो. तसेच नालासोपाऱ्यातील या पिकनिक स्पॉटवर जाण्यासाठी तुम्ही नालासोपारा रेल्वे स्थानका बाहेरून रिक्षाने जाऊ शकता. हे ठिकाणी वीकेंड प्लान बेस्ट होईल.

आचोळे तलाव

नालासोपारातील आचोळे तलाव हा तेथील स्थानिक लोक आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. संध्याकाळचे वातावरण मंत्रमुग्ध करून टाकते. तलावाच्या आजूबाजूला तुम्हाला हिरवळ पाहायला मिळेल. संध्याकाळचा सूर्यास्त आणि सकाळची सूर्यकिरणांनी आभाळ उजळून निघते. एक दिवसाच्या पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत छान फिरण्याचा प्लान करू शकता. येथे तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता. तसेच हे ठिकाण फोटोशूटसाठी देखील उत्तम राहील.

बौद्ध स्तूप

नालासोपारा येथील बौद्ध स्तूप हे पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे तुम्हाला वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळेल. या बौद्ध स्तूपला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. येथे तुम्हाला अद्भुत कलाकृती पाहायला मिळेल. हे बौद्ध धर्मासाठी खूप श्रद्धा स्थान आहे. तुम्ही येथे लहान मुलांसोबत येऊ शकता. त्यांनी इतिहासाची माहिती होईल. तसेच सुंदर शिल्पकला पाहायला मिळेल. येथे विविध कार्यक्रम होतात. इतिहासाची आणि कलेची आवड असणाऱ्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्हाला दगडी शिलालेख पाहायला मिळतील.

कळंब बीच

रोजच्या कामाच्या व्यापातून एक दिवस मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत घालवायचा असल्यास जवळच ठिकाण म्हणजे कळंब बीच (Kalamb Beach) होय. येथे तुम्ही संध्याकाळी आवर्जून भेट द्या. तुम्हाला नयनरम्य निसर्ग अुभवता येईल. सुट्टीत अनेक लोक तसेच पर्यटक देखील कळंब बीचकडे ओढले जातात. हा एक शांत समुद्रकिनारा आहे. खळखळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि थंड वारा मनाला आनंदी करून टाकतो. तसेच तुमचा मूड देखील फ्रेश होतो. तसेच येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची देखील उत्तम सोय आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT