Kolhapur Tourism : गड किल्ल्यांपासून धबधब्यांपर्यंत; पाहा कोल्हापूरचा निस्सीम देखावा; वन डे ट्रिपसाठी बेस्ट स्पॉट

Kolhapur Tourist Places : कोल्हापूरमध्ये फिरण्याचा प्लान करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी वन डे पिकनीकचे काही सुंदर स्पॉट शोधले आहेत. आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
Kolhapur Tourist Places
Kolhapur TourismSaam TV
Published On

सुट्टी मिळाली की सर्वांनाच आपली सुट्टी घरी बसून एन्जॅाय करावी नाही वाटत. सर्वानांच सुट्टी बाहेर फिरून एन्जॅाय करायची असते. त्यासाठी पर्यटक वेगवेगळी ठिकाणे शोधतात. अशाच पर्यटकांसाठी आम्ही कोल्हापूरच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती घेवून आलो आहोत. ज्यामुळे त्यांना कोल्हापूर शहर खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करता येईल.

सौंदर्याने परिपूर्ण असलेले कोल्हापूर शहर अनेक पर्यटकांचं आकर्षण बनलं आहे. कोल्हापूर शहर हे अभयारण्य, धरणे, जंगले, मंदिरे आणि थंड हवेच्या ठिकाणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहराचं नाव काढताच क्षणी आपल्याला तांबडा- पांढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ आठवते. या शहराला भेट देणारे अनेक पर्यटक या पदार्थाची चव घेतल्याशिवाय जात नाही. कोल्हापूर शहर महराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे. अनेक पर्यटक या शहराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. या शहराने त्याच्या सुंदरतेने सर्व पर्यटकांचे मन प्रसन्न केले आहे. तर तुम्ही सुद्धा सुट्टीत फिरण्याचा प्लान करत करत असाल तर, पंचगंगा नदीकाठी वसलेल्या कोल्हापूर शहराला भेट देण्यासाठी नक्की जा.

पन्हाळा किल्ला

महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्याच्या वायव्येस आहे. पन्हाळा हे महाराष्ट्रातील सर्वात लहान शहर आहे. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यापासून अठरा किमी अंतरावर आहे. ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा असलेला हा किल्ला अनेक पर्यटकाचं आकर्षण ठरला आहे.

Kolhapur Tourist Places
Kurla Tourist Places : कुर्ल्यामध्ये फिरण्यासाठी प्रसिद्ध ठिकाणे

दाजीपूर वन्यजीव अभयारण्य

महाराष्ट्रातील दाजीपूर वन्यजीव अभयारण्य १९८५ मध्ये वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्यामध्ये तुम्हाला वाघ, बिबट्या, अस्वल असे अनेक प्राणी पाहायला मिळतील. कोल्हापूरच्या महाराजांचे पूर्वीचे शिकार स्थळ म्हणून या अभयारण्यला बायसन अभयारण्य म्हणून ओळखतात. गर्दी झाडी अन् जंगलात वसलेले हे अभयारण्य अनेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्री छत्रपती शाहू महाराज

कोल्हापूर शहरातील छत्रपती शाहू महाराज पॅलेस सर्व पर्यटकानां आकर्षित करत आहे. या भव्य पॅलेसला बाहवणी मंडप कसाबा रोडवर १८७७-१८८४ मध्ये बांधण्यात आले होते. या संग्रहालयात आपल्याला छत्रपती शाहू महाराजांची पूर्वीच्या काळातील कलाकृती पाहायला मिळतील. हा आकर्षक करणारा पॅलेस छत्रपती शाहू महाराजांचं निवासस्थान म्हणून बांधला होता.

गगनबावडा

कोल्हापूर शहरापासून गगनबावडा ५५ किलोमीटर अंतरावर आहे. गगनबावडा हे शहर पश्चिम घाट आणि सह्याद्री शहरात वसलेले आहे. या शहरात आपल्याला अनेक धरणे,मंदिरे, आणि लेण्या पाहायला मिळतील. डोंगराच्या सानिध्यात असलेल्या या शहराचे बॉलिवूड चित्रपटांमध्ये शूट केले जाते.

रामतीर्थ धबधबा

कोल्हापूरमध्ये आजरा तालुक्यात हिरण्यकेशीच्या काठी रामतीर्थ धबधबा वाहतो. अनेक पर्यटक या धबधब्याला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भेट देत असता. या रामतीर्थ धबधब्याबरोबर आपल्याला अनेक मंदिरे ही पाहायला मिळतील. हा एक नैसर्गिक धबधबा आहे. पर्यटकांसाठी हा धबधबा एक आकर्षक ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे.

Kolhapur Tourist Places
Satara Tourist Place : खळखळ पाण्याने भरून वाहणारे साताऱ्यातील सुंदर धबधबे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com