Long Weekend Plan  SAAM TV
लाईफस्टाईल

Long Weekend Plan : लाँग वीकेंड येताच पिकनिकचे लागले वेध! मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी 'हे' पावसाळी डेस्टिनेशन बेस्ट

Monsoon Travel : पावसाळ्यात लाँग वीकेंडचा प्लान करायचा असल्यास महाराष्ट्रातील निसर्गरम्य धबधब्यांना आवर्जून भेट द्या. कुटुंब आणि मित्रमंडळी सोबत धमाल मजा मस्ती करा.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र फिरण्याचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येकजण पिकनिकचे प्लान करत आहेत. कारण उद्यापासून ५ दिवसांचा लाँग वीकेंड सुरू होत आहे. १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट पर्यंत अनेक लोकांना मोठी सुट्टी मिळाली आहे. काही लोक तर अशी मोठी सुट्टी घेत आहेत आणि मस्त कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करत आहेत. तुम्ही सुद्धा या लाँग वीकेंडसाठी बेस्ट डेस्टिनेशन शोधत आहात तर, महाराष्ट्रातील या अद्भूत ठिकाणांना भेट द्या. तसेच पावसामुळे या लाँग वीकेंडची मजा द्विगुणी होणार आहे. चला तर मग मनसोक्त एन्जॉय करण्यासाठी तयार व्हा.

धोबी धबधबा

धोबी धबधबा हा महाबळेश्वरमध्ये वसलेला आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य आणखी खुलून येते. तुम्ही कुटुंबासोबत महाबळेश्वरला लाँग वीकेंड प्लान करत असाल तर या धबधब्याला आवर्जून भेट द्या. मुंबईच्या धावपळीतून कुटुंबासोबत निवांत वेळ घालवा. कोसणाऱ्या धबधब्यांचे सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. हे स्वर्गसुख तुम्हाला पुढील कामांसाठी ऊर्जा देईल. मन शांतीसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

रंधा धबधबा

उंचावरून कोसळणारा रंधा धबधबा पावसाळ्यात पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. अनेक लोक येथे धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेतात. पावसाळ्यात दरीतून कोसळणारा हा धबधबा पाहणे मनाला आनंद देऊन जातो. येथे येताना तुम्हाला पर्वतांच्या सुंदर दृश्यांचा अनुभव घेता येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत येथे वीकेंड प्लान करू शकता.

भगीरथ धबधबा

भगीरथ धबधबा हा वांगणी येथे वसलेला आहे. पर्यटकांसाठी हा प्रसिद्ध धबधबा आहे. मुसळधार पावसात येथील सौंदर्य खुलून येते. धबधब्याच्या सभोवतालच वातावरण मनाला मंत्रमुग्ध करून टाकते.

लिंगमळा धबधबा

महाबळेश्वरमधील प्रेक्षणीय स्थळ म्हणून लिंगमळा धबधबा ओळखला जातो. निसर्गाने हिरवीगार चादर पांघरलेले आहे असा भास येथे होतो. वरून कोसळणारा लिंगमळा धबधबा वेण्णा तलावाला जाऊन मिळतो. तुमच्या मित्रमंडळींसोबत येथे मस्त लाँग वीकेंड प्लान करून तुफान मजा करा.

भिलार धबधबा

महाराष्ट्रातील पाचगणी येथे भिलार धबधबा वसलेला आहे. येथे तुम्ही कोसळणाऱ्या धबधब्याखाली भन्नाट फोटोशूट करू शकता. भिलार धबधबा हे पर्यटकांचे आकर्षण आहे. पावसाळ्यात येथे तुम्हाला ओलेचिंब रस्ते आणि हिरवागार निसर्ग पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT