Goa Travel : गोव्याचे सीक्रेट समुद्रकिनारे बघितलेत का? निसर्गाच्या सानिध्यात ट्रिप होईल Successful

Hidden Beaches In Goa : पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला अनेकांना आवडते. तुम्ही जर गोव्याला वीकेंड प्लान करत असाल तर गोव्यातील सीक्रेट बीचला भेट द्या आणि गोवा ट्रिपचा मनसोक्त आनंद लुटा.
Hidden Beaches In Goa
Goa TravelSAAM TV
Published On

पावसाळ्यात अनेकांना समुद्रकिनारी फिरायला आवडते. तुम्ही मित्रांसोबत गोवा ट्रिप प्लान करत असाल तर गोव्यात नेहमीच्या ठिकाणांना भेट देण्याऐवजी नवीन ठिकाण फिरा आणि गोव्यात दडलाय निसर्ग सौंदर्य अनुभवा. पावसाळ्यात गोव्याचं सौंदर्य खुलून येते. त्यामुळे 'या' सीक्रेट बीचना आवर्जून भेट द्या.

चोरला घाट

चोरला घाट हा गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेला आहे. हे महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन आहे. येथे तुम्हाला शांत आणि निवांत वातावरण पाहायला मिळेल. मुंबईच्या गजबजाटातून काही वेळ निवांत घालवायचा असल्यास या ठिकाणाला आवर्जून भेट दया. तसेच हे ठिकाण ट्रेकिंगसाठी देखील कमाल आहे.

बेतालबातिम बीच

बेतालबातिम बीच हा सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे. येथून सूर्यास्ताचे अद्भूत दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. पणजीपासून बेतालबातिम बीच जवळ आहे. या बीचला सनसेट बीच म्हणून देखील ओळखले जाते. हा समुद्रकिनारा शांत आहे. त्यामुळे तुम्हाला निसर्गाचा चांगला अनुभव येथे घेता येतो. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत या बीचला भेट देऊ शकता.

सलौलीम धरण

सलौलीम धरण हे दक्षिण गोव्यातील निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण आहे. हे गोव्यातील पर्यटकांचे आकर्षण आहे. येथील तुम्हाला निसर्गाचे चित्तथरारक दृश्य पाहायला मिळेल. कारण सलौलीम धरणाच्या आजूबाजूला टेकड्या आणि दऱ्या पाहायला मिळतात. येथे तुम्ही बोटिंग करण्याचा आनंद देखील घेऊ शकता.

Hidden Beaches In Goa
Relationship Tips : लग्नाआधीच पार्टनरसोबत ट्रिप प्लान करा; आयुष्यभरासाठी सोन्यासारखा संसार होईल

अगोंडा बीच

अगोंडा बीच पणजीपासून जवळ आहे. येथे तुम्हाला खळखळणाऱ्या लाटांचे अद्भूत दृश्य पाहायला मिळेल. येथे तुम्ही कँपिंग करू शकता.

बटरफ्लाई बीच

बटरफ्लाई बीचला पोहचण्यासाठी तुम्हाला जंगलातून ट्रेक करावा लागतो. तुम्हाला गोव्यातील पालोलम बीचला जाऊन त्या समुद्रकिनाऱ्यावरून बटरफ्लाई बीचसाठी बोटीने प्रवास करावा लागेल. तुम्ही येथे साहसी क्रियाकलाप करू शकता. या बीचला सीक्रेट बीच या नावाने देखील ओळखले जाते.

Hidden Beaches In Goa
Tourism Lohagad Fort : भय, साहस आणि सुंदरता एकाचवेळी तीन अनुभवांसाठी खास लोहगड; कसं जायचं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com