Shreya Maskar
पावसात आवर्जून डहाणू समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन अद्भूत सौंदर्य पाहा.
डहाणूचा समुद्रकिनारा चमकणारी वाळू आणि सुरूची झाडे यांसाठी प्रसिद्ध आहे.
डहाणू बीच हा शांत समुद्रकिनारा असून खूप स्वच्छ आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने पाण्यातील कासवे किनाऱ्यावर येतात. त्यांच्याशी खेळायला मुलांना फार मजा येईल.
तुम्हाला या समुद्रकिनाऱ्यावर उंच झाडे आणि हिरवळ पाहायला मिळेल.
डहाणू बीचवर तुम्ही घोडागाडीतून समुद्रसफरीचा आनंद घेऊ शकता.
फेसाळलेल्या लाटांचा समुद्र अनुभवताना डोळ्यांचे पारणे फिटते.
कुटुंबासाठी हा सुंदर पिकनिक स्पॉट आहे. सुरूच्या वनात बसून तुम्ही निवांत गप्पा मारू शकता.
जवळच असलेल्या डहाणू देवीच्या डोंगरापर्यंत तुम्ही ट्रेक करू शकता.
डहाणू चिकूंसाठी ओळखले जाते.हे चिकू महाराष्ट्राभर प्रसिद्ध आहेत.