Shreya Maskar
संपूर्ण महाराष्ट्राभर सध्या वारीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
टाळमृदुंगाच्या गजरात वारकरी दरवर्षी माऊलीच्या भेटीसाठी हजारो किलोमीटर पायपीट करतात.
मुंबईत वडाळा परिसरात 'विठ्ठल रुक्मिणी' चे प्राचीन मंदिर आहे.
असे म्हटलं जाते की, ४०० वर्षांपुर्वी या ठिकाणी तुकाराम महाराजांनी विठ्ठल मंदिराचा पाया रचला.
या विठ्ठल मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविकांची येथे गर्दी होते.
आषाढी एकादशीला या मंदिर परिसरात मोठा उत्सव पाहायला मिळतो.
या मंदिराला जाण्यासाठी वडाळा बस डेपोपासून कात्रक रोडसाठी बस घ्यावी.