Relationship Tips : लग्नाआधीच पार्टनरसोबत ट्रिप प्लान करा; आयुष्यभरासाठी सोन्यासारखा संसार होईल

Trip With Your Partner Before Marriage : आता तुम्ही सुद्धा लग्नाच्या तयारीत आहात तर आधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
Trip With Your Partner Before Marriage
Relationship Tips Saam TV
Published On

लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील खास क्षण असतो. लग्न झाल्यावर मुलगा असो किंवा मुलगी दोघेही एकमेकांना आयुष्याभर साथ देण्याचे वचन देतात. आता तुम्ही सुद्धा लग्नाच्या तयारीत आहात तर आधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

Trip With Your Partner Before Marriage
Sonakshi Sinha Marriage: सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुंबात नाराजी; आईसह भावाने केलं अभिनेत्रीला अनफॉलो; हळदीला उपस्थित राहणार नाही कुटुंब?

लव्ह मॅरेज असो अथवा अरेंज मॅरेज तुम्हाला लग्नाआधी पर्टनरसोबत एक तरी ट्रिप प्लान केली पाहिजे. कारण या ट्रिपमुळे तुम्ही पार्टनरला आणखी चांगल्या प्रकारे समजू शकाल. त्यासाठी पार्टनरसोबत जास्तीत जास्त संवाद साधा.

आपापसातील भांडणे

पर्टन आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही जेव्हा ट्रिप प्लान कराल तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी समजतील. यामध्ये सर्वात आधी घरातून परमिशन मिळवावी लागेल. तुमची फॅमिली यासाठी होकार देत नसेल तर पार्टनर त्याच्या आई वडिलांना आणि अन्य नातेवाईकांना कसे समजवत आहे. तसेच त्याचा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला ओळखता येईल.

एकमेकांची आवड

प्रवास करताना तुम्हाला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतील. यामध्ये विविध भाषा, संस्कृती आलेल्या व्यक्ती असतील. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना पार्टनर कसे बोलत आहे. तसेच या सर्वामध्ये तुमचे विचार जुळत आहेत का? हे देखील तुम्हाला समजेल.

भविष्याचे प्लान

ट्रिपला गेल्यानंतर तुम्ही तुमच्या भविष्याचे तुमचे प्लान पार्टनरला सांगू शकता. तसेच त्याचे प्लान सुद्धा ऐकू शकता. यामुळे तुम्हाला दोघांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. तसेच लग्नानंतरच्या भविष्यातील प्लॅनिंग प्रमाणे तुम्हाला राहता येईल.

Trip With Your Partner Before Marriage
Open Marriage करणं योग्य की अयोग्य? कसा असतो विवाह? काय होतात परिणाम जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com