Pune Hill Stations Saam Tv
लाईफस्टाईल

Hill Stations Near Pune: थंडगार वारा अन् पावसाळा; पुण्याजवळील या सुंदर हिल स्टेशन्सला तुम्ही भेट दिली का?

Pune Hill Stations: आज आम्ही तुम्हाला पुण्याजवळील अशा काही हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत आपला विकेंड एन्जॉय करू शकता.

Satish Kengar

Tourist Attractions Hill Station Near Pune: देशभरात गुरुवारपासून लाँग विकेंडला सुरुवात झाली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी रक्षाबंधन असल्याने अनेकांनी आपल्या विकेंडचा प्लॅन करण्यास सुरुवात केली आहे. यातच तुम्ही मुंबई किंवा पुण्यात राहत असल्यास आज आम्ही तुम्हाला पुण्याजवळील अशा काही हिल स्टेशन्सबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत आपला विकेंड एन्जॉय करू शकता. चला तर जाणून घेऊ, कोणते आहेत हे हिल स्टेशन....

लवासा

पुण्यापासून 57 किमी अंतरावर असलेल्या लवासामध्ये तुम्ही विकेंडचा प्लॅन करू शकता. लवासा हे पुण्याजवळील डोंगराळ शहर आहे. या हिल स्टेशनला पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. येथे तुम्हाला आलिशान हॉटेल्स, रिसॉर्ट्स, शॉपिंग मॉल्स इत्यादी सहज मिळतील. लवासा हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात वसलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. जिथे तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत छान सुट्टी घालवू शकता.

पाचगणी

लवासा व्यतिरिक्त तुम्ही पुण्यापासून 101 किमी अंतरावर असलेल्या पाचगणी हिल स्टेशनमध्ये विकेंडचा प्लॅन करू शकता. समुद्रसपाटीपासून 1,334 मीटर उंचीवर वसलेले, पाचगणी हे महाबळेश्वरजवळील एक सुंदर डोंगराळ ठिकाण आहे. या हिल स्टेशनच्या शोधाचे श्रेय ब्रिटिशांना जाते, ते आपली उन्हाळ्याची सुट्टी येथेच घालवत होते. हे हिल स्टेशन सह्याद्रीच्या पर्वतराजींच्या मध्यभागी वसलेले आहे. येथील मनमोहक वातावरण आणि विलोभनीय दृश्यांचा आनंद घेण्यासाठी वर्षभर पर्यटकांची वर्दळ असते.

माथेरान

तुम्ही पुण्यापासून 119 किमी अंतर प्रवास करून माथेरानला भेट देऊ शकता. हे माउंटन डेस्टिनेशन आपल्या नैसर्गिक आकर्षणे आणि थंड गार वातावरणासाठी ओळखलं जातं. त्यामुळेच देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात. समुद्रसपाटीपासून 2625 मीटर उंचीवर असलेला माथेरान हा पश्चिम घाटातील सर्वात सुंदर भागांपैकी एक आहे. आशियातील हे एकमेव ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. येथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासारखा आहे.

लोणावळा

लोणावळा हे पुण्यापासून 66 किमी अंतरावर आहे. हे राज्यातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन्सपैकी एक आहे. लोणावळा हे पुणे आणि मुंबईच्या जवळच्या वीकेंड गेटवेमध्ये मोजलं जातं, जेथे पर्यटक भेट देतात. विशेषतः पावसाळ्यात या ठिकाणाचे सौंदर्य पाहण्या सारखं असतं. लोणावळ्याच्या आसपास अनेक धबधबे, तलाव आणि टेकड्या आहेत. हे डोंगराळ ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खूप खास आहे.

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे पुण्यापासून 121 किमी अंतरावर आहे. हे राज्यातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशनपैकी एक आहे. हे हिल स्टेशन त्याच्या आकर्षक टेकड्या, धबधबे आणि नद्यांसाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला स्ट्रॉबेरीचे सुंदर वृक्षे पाहायला मिळते, जे या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात. हे हिल डेस्टिनेशन त्याच्या मनमोहक परिसरासह पुणे आणि मुंबईपासून एक उत्तम वीकेंड गेटवे म्हणून ओळखले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मला मविआने खलनायक ठरवलं, मराठा समाज हिंदुत्वाच्या बाजूने - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT