Cheapest cars in India Saam tv
लाईफस्टाईल

Cheapest cars in India : 27km मायलेज आणि किंमत ३.५४ लाखांपासून सुरु; पहिल्या कारचं स्वप्न करा पूर्ण

Top Cheapest petrol cars in india : परवडणारी कार खरेदी करायची असेल तर बाजारात अनेक स्वस्त आणि मस्त कार उपलब्ध आहेत. या कारची किंमत ३.५४ लाखांपासून सुरु आहे.

Vishal Gangurde

Top Cheapest petrol cars :

सध्या जमाना महागड्या कारचा आहे. अनेकांना महागड्या कार घेण्याची इच्छा असते. मात्र, बजेटचा विचार केला तर अनेकांना त्या महागड्या कार परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे परवडणारी कार खरेदी करायची असेल तर बाजारात अनेक स्वस्त आणि मस्त कार उपलब्ध आहेत. या कारची किंमत ३.५४ लाखांपासून सुरु आहे.

तुम्हाला आयुष्यातील पहिली कार खरेदी करायची आहे, त्यात बजेट कमी आहे. तर तुमच्यासाठी ४ बजेटमधील पेट्रोल कारची माहिती देत आहोत. या कारच्या अनेक ऑफरविषयीही माहिती देत आहोत.

मारुती सुझुकी ऑल्टो ८००

किंमत - 3.54 लाख रुपयांपासून सुरु

मायलेज - २२.०५ KMPL

सध्या मारुती सुझुकी ऑल्टो ८०० देशात स्वस्त प्रेट्रोल कार आहे. या कारमध्ये 796cc इंजिन आहे. तसेच २२ किलोमीटरचं मायलेज मिळत आहे. कारमध्ये बसायला सुटसुटीत जागा आहे. या कारमध्ये ५ जण बसू शकतात. अंटी लॉक ब्रकिंग सिस्टम देखील EBD आणि एअरबॅग्स मिळत आहे. ऑल्टो ८०० च्या दिल्ली एक्स-शो रुमची किंमत ३.५४ लाख रुपयांनी सुरु होते.

मारुती सुझुकी ऑल्टो के१०

किंमत : ३.९९ लाख रुपयांपासून सुरु

मायलेज : २४.९० kmpl

मारुती सुझुकी ऑल्टो के१० चांगली कार आहे. या कारचं डिझाइन तुम्हाला नक्की आवडेल. या कारमध्ये तुम्हाला चांगली जागा मिळत आहे. तसेच ही कार एका लिटरमध्ये २४.९० किलोमीटरपर्यंत धावते. या वाहनात ५ जण आरामात बसू शकतात. या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टमसोबत EBD आणि एअरबॅग्स देखील मिळतं. या कारची एक्स-शोरुम किंमत ३.९९ लाख रुपयांपासून सुरु होते.

मारुती सुझुकी s-Presso

किंमत - ४.२६ लाख रुपयांपासून सुरु

मायलेज - २५.३० kmpl

मायक्रो एसयूव्हीमध्ये मारुती सुझुकी एस-प्रेसो कार खूप प्रसिद्ध आहे. या कारमध्ये जागा व्यवस्थित आहे. या वाहनात १.० एल पेट्रोल इंजिन आहे. एका लीटरमध्ये ही कार २५.३० किलोमीटर मायलेजने धावते. तसेच कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम EBD आणि एअरबॅग्सची सुविधा मिळते. या कारची किंमत ४.२६ लाख रुपयांपासून सुरु होते.

Renault Kwid

किंमत - ४.६९ लाख रुपयांपासून सुरु

मायलेज - २१-२२ kmpl

kwid कारची डिझाइन स्पोर्टी आहे. या कारमध्ये चांगली जागा मिळते. फिचर्स देखील चांगले मिळतात. ५ जण कारमध्ये आरामशीर बसू शकतात. या कारमध्ये १.० एल इंजिन आहे. एक लीटरमध्ये ही कार २१-२२ KMPL मायलेज ऑफर करते. तसेच कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम EBD आणि एअरबॅग्स देखील आहे. या कारची शोरुम किंमत ४.६९ लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT