cheapest car in india
cheapest car in india Saam Tv
लाईफस्टाईल

Best Car's Under 5 lakhs In India: कमी किंमत आणि जबरदस्त मायलेज, पाच लाखांपेक्षा कमी किंमतीत येतात 'या' कार्स; पाहा संपूर्ण लिस्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cheapest car in India under 5 lakh : कार खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अशातच अनेकजण कमी बजेटमध्ये बेस्ट कार खरेदी करण्याचा विचार करतात. यातच जर तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट पाच लाखांपेक्षा कमी आहे? तर चिंता करू नका.

आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अशा काही कार्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमच्या बजेटमध्ये असून याचे फीचर्सही बेस्ट आहे. चला तर जाणून घेऊ कोणत्या आहेत या कार्स.... (Latest Marathi News)

मारुती सुझुकी K10 (Maruti Suzuki K10 CNG)

Maruti Suzuki K10 CNG ची किंमत 5,94,500 रुपये आहे, जी एक्स-शोरूम किंमत आहे. कंपनी फक्त 66,000 रुपयांच्या डाऊन पेमेंटवर ही कार विकत आहे. याशिवाय तुम्ही ही कार 12,444 रुपयांमध्ये EMI वर देखील खरेदी करू शकता.

या CMG कारमध्ये 998cc इंजिन आहे. जे 55.92bhp पॉवर आणि 82.1Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. ही कार 33.85 किमी प्रतितास कमी मायलेज देते. हे ARAI द्वारे प्रमाणित आहे. (Latest Auto News in Marathi)

Hyundai Grand i10 Nios CNG

Hyundai Grand i10 Nios CNG ची डिझाइन कंपनीने मध्यमवर्गीय कुटुंबाला लक्षात घेऊन केली आहे. ही कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. कंपनीने I10 Neos 7 लाख ते 9 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान लॉन्च केली आहे.

Grand i10 Nios CNG ला 1197cc इंजिन मिळते जे 67.72bhp पॉवर आणि 95.2Nm पीक टॉर्क जनरेट करते. याचे मायलेज 27.3 kmpl आहे जे ARAI द्वारे प्रमाणित आहे.

रेनॉल्ट क्विड (Renault kwid)

Renault Kwid कारची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटो दोन्ही पर्याय मिळतील. याशिवाय यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 68 पीएस पॉवर आणि 72 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. यात डिजिटल फीचर्स आणि टच स्क्रीनही मिळणार आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)

मारुती सुझुकी सेलेरियो ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. ही एल 5 सीटर कार असून याची एक्स-शोरूम किंमत 5.35 लाख ते 7.13 लाखांपर्यंत आहे. या मॉडेलमध्ये तुम्हाला CNG आणि पेट्रोलचा पर्याय देखील मिळेल. हे 998cc पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 66 PF पॉवर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करते. Maruti Suzuki Celerio मायलेज 26.68 kmpl आहे आणि पेट्रोलचे मायलेज 35.6 kmpl देते.

टाटा टिगोर (Tata Tigor)

टाटा टिगोर ही भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी परवडणारी कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. सेडान कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे. जे 84 Bhp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते.

टाटा टिगोर 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतो. या कारचा सीएनजी प्रकार 72 बीएचपी पॉवर जनरेट करतो. Tata Tigor पेट्रोलचे मायलेज 19.6 kmpl आहे, तर CNG प्रकार 26.49 kmpl परत करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report: दक्षिण मुंबईत कोणत्या शिवसेनेचा विजय होईल? कोणाजी ताकद जास्त?

Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

Summer Travel Tips: उन्हाळ्यात फिरायला जाताना या गोष्टी बॅगेत ठेवायला विसरु नका; ऐनवेळी सापडाल अडचणीत

Pune Crime News: पुण्यात सिनेस्टाईल थरार; दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानावर दरोडा, लाखोंचा माल लंपास

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

SCROLL FOR NEXT