Skin care tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Skin Care : त्वचेसाठी कच्ची कैरी अशी ठरेल फायदेशीर...

असा करा कच्च्या कैरीचा चेहऱ्यासाठी उपयोग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळा सुरू झाल्यावर सगळीकडे सर्वत्र दिसू लागते ती कच्ची कैरी. उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी आणि आपले जेवण रुचकर बनवण्यासाठी लोक कच्च्या कैरीचा भरपूर वापर करतात. त्याचबरोबर कैरीचे पन्ह, चटणी व लोणची अशा अनेक गोष्टी उन्हाळ्यात खाल्ल्या जातात. पण त्वचेची निगा राखण्यासाठी कच्च्या कैरीचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

हे देखील पहा -

उन्हाळ्यात ऊन, धूळ आणि घामामुळे त्वचेवर (Skin) मुरुमे, टॅनिंग, सनबर्न, सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा यांसारख्या समस्या दिसू लागतात. कच्च्या कैरीत असणाऱ्या अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते. त्याच वेळी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी त्वचेच्या मृत पेशी काढून त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात.

कच्चा कैरीत व्हिटॅमिन (Vitamin) ए, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंटचा स्रोत कच्च्या कैरीला समजले जाते. उन्हाळ्यात कच्च्या कैरीमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासूनही सुटका मिळते.

चला तर मग जाणून घेऊया कच्च्या कैरीचे त्वचेवर होणारे फायदे.

१. कच्ची कैरी आणि ओट्सचा फेस पॅक -

हा फेस पॅक त्वचेच्या मृत पेशी काढून टाकून त्वचेचा टोन सुधारण्यासाठी मदत करतो. यासाठी कच्ची कैरी कापून बारीक करून घ्या. त्यात ओट्स, बदामाची पावडर व कच्चे दूध घालून चांगले मिसळा. पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, त्यानंतर १५ मिनिटांनी स्वच्छ पाण्याने (Water) धुवा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक वापरल्याने तुमची त्वचा मुलायम होईल.

२. कच्ची कैरी आणि बेसन फेस पॅक -

उन्हाळ्यात मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी कच्ची कैरी कापून बारीक करा. त्यात बेसन, मध, दही आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा फेसपॅक वापरल्याने तुमची त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्याची चमकही कायम राहते.

तर असा करा कच्च्या कैरीचा चेहऱ्यासाठी उपयोग आणि मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT