Benefits of Jayfal Saam TV
लाईफस्टाईल

Benefits of Nutmeg : जयफळ म्हणजे विविध गुणांचा खजिना; फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल

Benefits of Jayfal : आरोग्याशी संबंधीत विविध समस्या जायफळाचे सेवन केल्याने दूर होतात. मात्र अनेक व्यक्तींना जायफळाचे हे फायदे माहिती नाहीत.

Ruchika Jadhav

भारतीय विविध मसाल्यांमध्ये जायफळ सुद्धा एक खास मसाल्याचा प्रकार आहे. जायफळ प्रत्येकाच्या घरात सहज मिळतं. शक्यतो जेवणात पदार्थाची चव वाढवण्यासाठी याचा वापर होतो. गोड किंवा मग तिखट स्वाद आणखी छान लागावा यासाठी विविध पदार्थांमध्ये जायफळ हमखास टाकलं जातं.

जेवणासह जायफळाला आयुर्वेदात सुद्धा मोठं महत्व आहे. आरोग्याशी संबंधीत विविध समस्या जायफळाचे सेवन केल्याने दूर होतात. मात्र अनेक व्यक्तींना जायफळाचे हे फायदे माहिती नाहीत. त्यामुळे आज जायफळ खाण्याचे आपल्या आरोग्याला मिळणारे फायदे काय आहेत? त्याची माहिती जाणून घेऊ.

जास्तप्रमाणात अँटीऑक्सिडंट

जायफळात जास्तप्रमाणात अँटीऑक्सिडंट असतं. अँटीऑक्सिडंट शरीरात जास्त असल्याने आपल्याला स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. अँटीऑक्सिडंटचं प्रमाण कमी असणे आरोग्यासाठी चांगले नाही. उलट अँटीऑक्सिडंट जास्त असेल तर कॅन्सर सारख्या आजारांशी सुद्धा दोन हात करता येतात.

अंगदुखीवर गुणकारी

जायफळामध्ये विविध गुण असतात. ज्या व्यक्तींना सतत अंगदुखीच्या समस्या असतील त्यांनी कायम जायफळाचे सेवन करावे. काही कारणास्तव आपले हात-पाय सुजतात. तसेच लागल्यावर आणि पडल्यावर देखील आपल्या शरीरावर सूज येते. त्यामुळे तुम्ही अंगदुखीसाठी जायफळचं सेवन करू शकता.

मानसिक स्वास्थ

विविध गुणांनी समृद्ध असलेलं जायफळ खाल्ल्याने मानसिक ताणतणाव सुद्धा कमी होतो. तसेच यामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात नाही. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कारणाने ताण तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मानसिक स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा जायफळाचं सेवन करू शकता.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT