peru yandex
लाईफस्टाईल

benefits of guava : पेरू - केवळ चविष्ट नाही तर गुणकारीही

Sneha Dhavale

फळ खाणं हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतं, यात शंका नाही. प्रत्येक फळामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. प्रत्येक फळ खाण्याचे फायदे आहेत. हिरवागार, करकरीत पेरू खाण्याची मजा काही औरच. काहीसा आंबट, काहीसा गोड आणि तुरट चवीचा पेरू खायला बऱ्याच जणांना आवडतो. कधी पांढरा तर कधी लालसर, गुलबट रंगाचा लहान लहान बिया असलेला गर. पेरू चविष्ट आहेच पण सोबतच अनेक गुणांनी युक्त आहे. पेरू काहीसं उष्ण हवामान असणाऱ्या भागात जास्त चांगल्या प्रकारे वाढतात.

पेरूमध्ये 'व्हिटामिन सी' म्हणजेच 'क जीवनसत्व' चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सत्वपुर्ण गुणधर्माचे पेरू हे फळ बुद्धिवर्धक म्हणजे 'सूपरफूड फॉर ब्रेन' आहे. बौद्धिकदृष्ट्या आव्हानात्मक असणारी कामं करणाऱ्या व्यक्तींनी तर आवर्जून पेरु खावा. कारण यामुळे मानसिक थकवासुद्धा दूर होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. उत्साह निर्माण होतो. केवळ फळचं नाही तर आपण पेरूपासून तयार केलेला जॅम, रायता ,सरबत आणि मुरंबा यासारखे असे पर्याय खाऊ शकतो. त्यातही पेरूचं सरबत हे अत्यंत प्रभावी आहे.

काळं मीठ, थोडीशी साखर, जिरे पुड घालून तयार केलेले पेरूचं सरबत हे अतिशय पाचक आणि गुणकारी आहे. पेरु हा मुळातच रुचकर आहे. त्यामुळं भूक न लागणे किंवा मंदावणे, आम्लपित्ताची समस्या, तोंडाला चव नसणे यासारख्या विकारांवर पेरू खाणं अतिशय उपयोगी ठरते. मलविसर्जनामध्ये अडचण येत असल्यास काही दिवस नियमितपणे पेरूचे सेवन केल्याने समस्या दूर होते.

बरं फक्त पेरुच नाही तर पेरुची पानेही अतिशय गुणकारी असतात. काही स्त्रियांमध्ये श्वेतप्रदराची समस्या असते. अशा स्त्रियांनी पेरूच्या कोवळ्या पानांचा काढा करुन प्यायल्यास श्वेतप्रदराची समस्या दूर होते. गरोदर स्त्रीयांनाही जर उलटी आणि मळमळ, तोंडाला चव नसणे, असे त्रास होत असतील तर पेरुचं सेवन किंवा पेरूच्या सरबताचं सेवन करणे नक्कीच आराम देईल, असं आहार तज्ज्ञ सांगतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटर की कायद्याच्या चिंधड्या? अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधकांची 'फायरिंग', मित्रपक्षाकडूनही महायुतीची कोंडी

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

konkan : कोकणातल्या गर्द झाडीत लपलाय ऐतिहासिक किल्ला

PM Modi Pune Visit : PM नरेंद्र मोदी २६ रोजी पुणे दौऱ्यावर, कसा असेल दौरा? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT