बदलत्या ऋतूप्रमाणे आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे सुद्धा आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी प्रत्येकाने व्यायाम, योग्य पोषक आहार तसेच भरपूर प्रमाणात पाणी, शारीरिक स्वच्छता यासगळ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. याने गंभीर किंवा संसर्गजन्य रोगांची लागण होत नाही.
आहार असा असावा की हिवाळ्याच्या काळात आपण आपल्या जेवणात अशा काही गोष्टींचा समावेश करतो, ज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. तीळ हे असेच एक हिवाळ्यातील सुपरफूड आहे, जे या ऋतूत खाल्ल्याने बरेच फायदे होतील. आहारतज्ञ प्रेरणा सांगतात की, तीळ तुमचे हिवाळ्यापासून तसेच आजकाल देशातील बहुतांश भागांमध्ये पसरलेल्या प्रदूषणापासून संरक्षण करू शकतात. जाणून घ्या 21 दिवस रोज तीळ खाल्ल्यास काय होईल आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे?
डायटीशियन प्रेरणा चौव्हाण हिवाळ्यातील सुपरफूड म्हणजे तिळाच्या बियांबद्दल सांगत आहेत, जी एक व्यावसायिक आहारतज्ञ आणि प्रसिद्ध YouTuber आहे, जी दररोज तिच्या पेजवर व्हिडिओंद्वारे आरोग्याशी संबंधित माहिती शेअर करते.
प्रतिकारशक्ती मजबूत करा
आहारतज्ज्ञ प्रेरणा सांगतात की, तीळ हे औषधापेक्षा कमी गुणकारी नाही. सर्व वयोगटातील लोक ते सहज खाऊ शकतात. गरोदर स्रिया देखील काही खबरदारी घेऊन तीळाचे सेवन करू शकतात. झिंक आणि सेलेनियम यांसारखे घटक तिळामध्ये असतात. त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. या बिया आपल्याला संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
हाडे मजबूत करा
आहारतज्ज्ञ प्रेरणा सांगतात की, तीळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असते. त्यामुळे कमकूवत हाडे आणि दात मजबूत करतील. २१ दिवस रोज तीळाचे सेवन केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. त्यासह ज्या व्यक्तींच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे किंवा संधिवात आहे त्यांनी रोज तीळ खाणे खूप फायदेशीर ठरेल.
फुफ्फुसांना डिटॉक्स करा
तीळ आपल्या फुफ्फुसांना खोलवर स्वच्छ करू शकतात. या बिया गुळात मिसळून खाल्ल्यास फुफ्फुसांना प्रदूषणाचा त्रास होत नाही.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तीळ हे ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि मॅग्नेशियमचे स्रोत आहे, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे रक्तदाब नियंत्रित करते, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते आणि हृदयविकारांपासूनही आपले संरक्षण करते. 21 दिवस तीळ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
अशक्तपणा दूर करा
तीळांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते, जे रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणा असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणारे आहे.
तीळ खाल्ल्यानेही रक्त शुद्ध होते. रक्तामध्ये विषारी घटक असल्यास त्वचेच्या समस्या वाढतात. तीळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि हिमोग्लोबिनची पातळीही वाढते.
तीळ कसे खावेत?
आहारतज्ञ प्रेरणा सुचवितात की तीळ खाण्याचे काही सोपे मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
तीळ आणि गूळ एकत्र करून त्याचे सेवन करा. त्याचे छोटे लाडू बनवून सुद्धा खाऊ शकता. तुम्ही लाल, काळे, पांढरे असे सगळे तीळ एकत्र करून गुळ मिक्स करून लाडू तयार करू शकता.
टीप: वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By: Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.