प्रत्येक ऋतूप्रमाणे आपण आपल्या खाण्याच्या पद्धती बदलतो. अर्थात ते खूप फायदेशीर असते. आता थंडीच्या दिवसात आपण थंड पदार्थ खाणे टाळतो. त्याऐवजी आपण गरम पदार्थ म्हणजेच ज्याने आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होईल अशा पदार्थांचे सेवन करतो. थंडीच्या दिवसांमध्ये उत्तम आरोग्यासाठी आहारही आरोग्यदायी असणे आवश्यक असते. त्यासाठी नाचणीचे सूप हा एक उत्तम पर्याय आहे. याची रेसिपी अगदी साधी सोपी आहे.
नाचणीचे सुप बनवण्याचे साहित्य पुढीलप्रमाणे आहे
नाचणीच्या पिठाचं सूप बनवण्यासाठी विविध भाज्यांचा वापर केला जातो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. गाजर
शिमला मिरची
कांद्याची पात
पत्ताकोबी
बारीक चिरलेली हिरवी मिरची
बारीक चिरलेले अद्रक लसूण
सोया सॉस
काळी मिरची पावडर
टोमॅटो सॉस
तेल
नाचणीचे सुप बनवण्याची कृती
तुम्ही हे सुप किती लोकांसाठी बनवणार आहात? त्यानुसार तुम्हाला प्रमाण ठरवायचं आहे. एक चमचा नाचणीच्या पिठासाठी तुम्हाला एक वाटी पाणी घ्यायचं आहे. सर्वप्रथम नाचणीचे पीठ हे छान भाजून घ्या. हलकसं ब्राऊन होईपर्यंत पीठ भाजायचे आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्या. त्या तेलामध्ये सुरुवातीला लसूण, अद्रक, हिरवी मिरची छान भाजून घ्या. आता सर्व चिरून घेतलेल्या भाज्या मिक्स करा. त्याही हळूहळू फ्राय करून घ्यायच्या आहेत. भाज्या चांगल्या भाजल्या की त्याच्यामध्ये एक वाटी पाणी अॅड कराआणि त्याला उकळी येऊ द्या.
भाजलेल्या पिठामध्ये थोडं पाणी अॅड करून पीठ एकत्र छान मिक्स करून घ्यायचं. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये हे पीठ मिक्स करायचे आहे. त्यानंतर एका वाटीसाठी तुम्ही एक चमचा काळीमिरी पावडर, तसेच तुमच्या आवडीनुसार टोमॅटो सॉस आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. त्याला एक छान उकळी येऊ द्यायची. त्यानंतर वरून त्याला गार्निशिंगसाठी कांद्याची पात टाकावी व जर तुमच्याकडे तळलेले नूडल्स असतील तर ते सुद्धा तुम्ही गार्निशिंगसाठी वापरू शकता. तयार आहे तुमचे थंडीसाठी स्पेशल नाचणीचे सूप.
Edited By: Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.