आता हिवाळा आला आहे आणि आपल्या त्वचेला आवश्यक असलेली अतिरिक्त काळजी घेण्याची वेळ आली आहे. थंडीत जवळपास सगळ्यांचीच स्किन कोरडी पडते. त्यामुळे ऑफीसला जाताना, बाहेर जाताना आपण चांगले दिसत नाही, किंवा आपल्याला फ्रेश वाटत नाही. या समस्येचा विचार करून आम्ही तुम्हाला थंडीत फॉलो करायचे रूटीन आणि सुंदर तजेलदार त्वचा कशी मिळवायची हे सांगणार आहोत.
तुम्ही टिनेजर असाल, गृहीणी असाल, तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल तरी हे रुटीन फॉलो करू शकता. तुम्हाला हिवाळ्यात ग्लोइंग आणि हायड्रेटिंग स्कीन हवी असेल असेल तर पुढील टीप्स आणि स्टेप्स फॉलो करू शकता. ही माहिती सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही पाहू शकता.
१. कोरडेपणा
थंडीमध्ये तुमचे हात पाय कोरडे पडत असतील तर तुम्हील बॉडी बटर वापरू शकता. त्याने तुमच्या शरीराला हायड्रेशन मिळेल, तसेच त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी सुद्धा ते खूप फायदेशीर आहे.
२ पायांच्या भेगा
थंडीमध्ये अनेक जणांच्या पायांना पडतात. हाता-पायाचे कोपरे काळे पडतात. अशा समस्यांसाठी तुम्ही स्मुथ रिपेअर लोशनचा वापर करू शकता. त्याने तुमच्या त्वचेला योग्य प्रमाणात हायड्रेशन मिळेल. हे तुम्ही अंघोळ केल्यानंतर हातापायाच्या कोपऱ्यांना लावा त्याने तुम्हाला काहीच दिवसात सॉफ्ट स्किन मिळेल.
३. चेहरा कोरडा पडणे
थंडीमध्ये त्वचे बरोबर चेहरा सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरडा पडतो. चेहरा कोरडा पडल्याने काही काळातच तो काळवंडतो. त्यासाठी तुम्ही मॉइ्श्चरायझिंग क्रीम आणि हायड्रेटिंग क्रिमचा वापर करू शकता. तुमची त्वचा ऑयली, सेन्सीटिव्ह, ड्राय असेल तरी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता.
४. भरपूर पाण्याचे सेवन करा
पुरेशा प्रमाणात पाणी आपल्या शरीरातील घाण काढून टाकते आणि शरीरातील नवीन पेशी बनवते, तर तुम्ही त्यात आरोग्यदायी गोष्टी मिसळूनही पाणी पिऊ शकता. तुम्ही सकाळी एक चिमूटभर दालचिनी मिसळून पाणी पिऊ शकता, यामुळे तुमचे वजन कमी होईलच पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरीचा रस पाण्यात मिसळून पिऊ शकता नियमितपणे चेहऱ्यावरील डाग आणि डाग नाहीसे होतात आणि चेहरा चमकेल.
५. साबण वापरू नका
साबण वापरल्याशिवाय तुमची त्वचा स्वच्छ होत नाही, पण तुम्हाला माहिती आहे का की साबणाचा जास्त वापर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगला नाही. साबणामध्ये काही रसायने असतात जी त्वचा निर्जीव बनवतात आणि त्वचेतील नैसर्गिक तेल आणि सीबम काढून टाकतात आणि त्वचा खराब होऊ लागते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साबणाऐवजी घरगुती वस्तू वापरू शकता.
Edited By: Sakshi Jadhav