Shreya Maskar
ब्रोकोली लेमन राईस बनवण्यासाठी तांदूळ, ऑलिव्ह तेल, कांदे, लाल मिरची, चवीनुसार मीठ, ब्रोकोली, जिरे, लसूण, हळद आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.
ब्रोकोली लेमन राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ शिजवून घ्या.
एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरे, कांदा, लसूण आणि लाल मिरच्या घालून छान मिक्स करून घ्या.
त्यानंतर यात थोडी हळद आणि ब्रोकोलीचे तुकडे टाका.
आता मंच आचेवर १० ते १५ मिनिटे छान शिजवून घ्या.
ब्रोकोली शिजल्यावर त्यात लिंबाचा रस घाला.
आता वाफवलेला राईस या मिश्रणात टाकून छान एकजीव करा.
शेवटी न विसरता चवीनुसार मीठ घालायला विसरू नका.