ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वेलची एक औषधी वनस्पती आहे. अनेक शारीरिक समस्यांवर वेलची रामबाण उपाय आहे. वेलचीला, वेलदोडा, इलायची, विलायची वेलदोडा असेही म्हटले जाते.
वेलचीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅलशियम असतात.तसेच भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. जे मानसिक तणात कमी करण्यास मदत करतात.
वेलचीचे सेवन केल्यास मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. आणि मेंदूला शांत ठेवण्यास मदत करतात.
पोटांच्या समस्यांवर वेलची गुणकारी आहे. दररोज आहारात समावेश केल्याने अपचनाची समस्या दूर होते.
वेलची एक नैसर्गिक माऊथ फ्रेशनर आहे. नियमित वेलची चघळून खाल्ल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होते.
तसेच दररोज वेलचीचा आहारात समावेश केल्याने पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. आणि वजन कमी होण्यास मदत करते.
वेलचीचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ युरीन द्वारे बाहेर पडते आणि शरीर डिटॅाक्स करण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग