ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्राजक्ताची फुले यांना पारिजातक म्हणूनही ओळखले जाते. तसेच या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक,अशा अनेक नावांनी देखील ओळखले जाते.
ही फुल रात्रीच फुलतात. या फुलांचा सुगंध मनमोहक असतो. या फुलांचा सुगंध जीवनातील तणाव दूर करतो.
आज आम्ही तुम्हाला सांगू की कशाप्रकारे तुम्ही या वनस्पतीला आपल्या घरातल्या बागेत लावू शकता.
सर्वप्रथम वनस्पती रोपवाटीकेतून पारिजात रोप विकत घ्या, एक मोठ्या आकाराची कुंडी घ्या त्यात मऊ आणि निचरा होणारी माती सोबत सेंद्रिय खत टाकून मिसळून घ्या.
आता, पारिजातकाच्या रोपाला या कुंडीमध्ये व्यवस्थित लावा. आणि थोडेसे पाणी घालून सूर्यप्रकाशाच्या दिशेने कुंडीला ठेवा. जेणेकरुन रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल.
उन्हाळ्यात या रोपाला दर दोन दिवसानी पाणी द्यावे तर हिवाळ्यात आठवड्यातून एकदाच पाणी द्यावे
महिन्यातून एकदा या झाडाला खत घालावे. तसेच किड लागल्यापासून वाचवण्यासाठी निंबोळी तेलाची फवारणी करा.
तुम्ही जर या झाडाची योग्य काळजी घेतली तर लवकरच याला फुले येऊ लागतील. तुम्ही या फुलांचा पुजेला किंवा गजरा बनवण्यासाठी उपयोग करु शकता.
NEXT: तुमच्या जोडीदाराला द्या या रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल