Weight Loss Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Weight Loss Tips : एकाच वेळी ही सहा कामे केल्यास वाढलेली ढेरी गायब होईल; बारीक व्हायचंय तर आजपासूनच सुरुवात करा

Belly Fat Removal Tips : काही केल्या वजन कमी होत नाही. त्यामुळे आज वजन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य ट्रिक सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपण स्लिम आणि फिट असावं असं प्रत्येकाला वाटतं. मात्र रोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्यक्तींना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. लठ्ठ आणि जाड व्यक्ती बारीक होण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. मात्र कायम त्यांच्या पदरी नैराश्य येते. काही केल्या वजन कमी होत नाही. त्यामुळे आज वजन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य ट्रिक सांगणार आहोत. या सहा गोष्टी दररोज फॉलो केल्यास एका महिन्यात तुमचे वजन कमी होईल.

या पदार्थांचे सेवन करा

वजन कमी करण्याचा पहिला मार्ग म्हणजे तुमचे अन्न. तुम्ही किती खाता आणि काय खाता हे महत्त्वाचे आहे. सर्वात आधी तुमचा डाएट चार्ट बनवून घ्या. यामध्ये प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच फॅट्स आणि प्रोसेड फूड असलेले पदार्थ खाऊ नका.

एक्सरसाइज करा

वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करणे फार गरजेचे आहे. शरीराची झीज झाल्याशिवाय तुम्ही बारीक होणार नाही. त्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज सर्वात बेस्ट आहे. यामध्ये धावणे, पळणे, सायकलिंग आणि स्विमिंग या एक्सरसाइज सर्वात उत्तम आहेत. यामध्ये आपल्या शरीराची जास्तीत जास्त हालचाल होते. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला स्वीट पेन जाणवेल. मात्र याने मसल्स स्ट्रॉंग होतात. तसेच वजन झपाट्याने कमी होते.

पाणी

आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करते ते म्हणजे पाणी. पाण्याला कोणतीही चव नसली तरी देखील पाणी अनेक आजारांवर मात करते. व्यायाम करताना आपल्या शरीराला पाण्याची जास्तीत जास्त गरज असते. त्यामुळे दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिलेच पाहिजे. याने आपले पोट देखील साफ होते. तसेच पोटावरील चरबी कमी होते.

भरपेट खाऊ नका

अनेक व्यक्तींना दिवसातून तीन वेळा जेवण्याची सवय असते. दिवसातून तीन वेळा भरपूर जेवण केल्याने आपल्याला सतत भूक लागते. त्यामुळे सायंकाळी ४ किंवा ५ वाजता देखील व्यक्ती नाश्ता करतात. असे केल्याने वजन वाढते. त्यामुळे दिवसभरात एक ते दोन तासांचा गॅप घेऊन थोडे थोडे अन्न खा. याने मेटापोलिझम नियंत्रित राहते आणि वजन कमी होते.

पूर्ण झोप घ्या

वजन कमी करायचे म्हणून झोप अपूर्ण ठेवू नका. दिवसातून सात ते आठ तास झोप झालीच पाहिजे. झोप पूर्ण न झाल्याने आपल्याला स्ट्रेस येतो. स्ट्रेस वाढत चालल्याने देखील वजन वाढते. त्यामुळे स्ट्रेसवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रीची झोप पूर्ण घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT