Manasvi Choudhary
कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना उद्भवत आहे. केसांच्या पेशींमधील मेलॅनिनच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात.
वाढत्या वयात केस पांढरे होणे ही समस्या सामान्य असली तरी आजकाला तरूणपणात देखील या समस्येचा त्रास सुरू आहे.
अनेकजण केस काळे करण्यासाठी हेअर डाय, हेअर कलर्स आणि रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. मात्र यामुळे केसांचा पोत देखील बिघडू शकतो. केस कोरडे होतात. यासाठी आज आम्ही घरगुती सोपा उपाय सांगणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
तुरटी, आवळा, लिंबाचा रस आणि कढीपत्ता केसांतील पांढरा रंग नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करते.Home Remedies
सर्वातआधी तुरटीची बारीक पावडर करा. एका भांड्यात पाणी घ्या त्यात आवळ्याची पावडर, कढीपत्ता आणि तुरटीची पावडर मिक्स करा.
या मिश्रणात लिंबाचा रस मिक्स करा आणि मिश्रण चांगले उकळून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर गाळून घ्या. केस धुतल्यानंतर तुम्ही हे पाणी केसांवर वापरू शकता.
१) केसांसाठी आवळा, कढीपत्ता आणि तुरटी चा हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. यामुळे केस पांढरे होणं कमी होते त्याचबरोबर केसांची मुळे देखील मजबूत होतात.
२) कोंडा, खाज यासांरख्या समस्या देखील कमी होतात केस अधिक निरोगी आणि चमकदार दिसतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.