Manasvi Choudhary
चुकीच्या जीवशैलीचा परिणाम केवळ आरोग्यावरच नाही तर शरीरावर दिसून येतो. शरीराला फिट ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
वजन कमी करण्यासाठी जिम, डाएट, योगा अनेक गौळ्या-औषधे हे उपाय केले जातात.
मात्र तुम्हाला माहितीये का? दररोज ३० मिनिटे सायकल चालवल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
१) वैद्यकीय सल्ल्यानुसार, सायकल चालवणे ही एरोबिक एक्सरसाईज आहे ज्यामुळे हृदय, फुफ्फुसे आणि स्नायू यांचा व्यायाम होतो.
२) वजन कमी करण्यासाठी शरीरातील कॅलरीज बर्न करणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही ३० मिनिटे म्हणजे सायकल चालवून अंदाजे २०० ते ५०० कॅलरीज बर्न करू शकता.
३) साधारण दिवसाला २०० ते ५०० म्हणजेच एका महिन्यात अंदाजे ९, ००० कॅलरीज बर्न होतील ज्यामुळे तुमचे वजन महिनाभरात जलदगतीने कमी होण्यास मदत होते.
४) सायकल चालवल्याने कार्डिओ व्यायाम होतो ज्यामुळे शरीरात साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
५) सायकल चालवल्याने संपूर्ण शरीरावर ताण येतो यामुळे वजन कमी होतेच पण स्नायूही बळकट होतात व मानसिक ताण देखील कमी होतो.
सायकल चालवताना पाणी पिणे आवश्यक आहे यामुळे शरीराची कार्यप्रणाली सुरळीत राहण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.