Manasvi Choudhary
चेहऱ्यावर बारीक बारीक केस असणे ही समस्या सामान्य आहे. अनेक महिला व मुली चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी पार्लरमध्ये थ्रेडिंग आणि वॅक्सिंग करतात.
मात्र आता आम्ही सोपी ट्रिक सांगणार आहोत जी वापरून तुम्ही घरीच चेहऱ्यावरचे केस काढू शकता.
घरच्या घरी फेशियल वॅक्स करण्यासाठी तुम्हाला साखर आणि लिंबू हे साहित्य वापरावे लागणार आहे.
सर्वातआधी, गॅसवर एका भांड्यामध्ये साखर, लिंबाचा रस आणि पाणी हे मिश्रण चांगले उकळून घ्या.
नंतर या मिश्रणात अर्धा चमच कॉफी पावडर मिक्स करा. मिश्रण थंड झाले की आणि त्यात खोबरेल तेल मिक्स करा.
चेहरा स्वच्छ धुवून तुम्ही हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि साधारण १० ते १५ मिनिटे ठेवा.
यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा.