सध्या सर्वत्र दिवाळी सणाची सुरुवात मोठ्या थाटामाटात सुरु झाली आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे. त्याबरोबर या दिवसांत आपल्याला सर्वत्र आनंद आणि उत्साह पाहायला मिळतो. दिवाळी सणांमध्ये आपल्याला सर्वत्र आकर्षक कंदीले, दिवे आणि सुंदर सजावट पाहायला मिळते. त्याचबरोबर दिवाळीमध्ये नवनवीन फराळ बनवला जातो. याबरोबर देशभरात देवी लक्ष्मीची पूजा नेहमी केली जाते.
पण दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मी पूजन सणाला फार महत्व आहे. प्रत्येक नागरिक आपल्या भक्तीनुसार देवी लक्ष्मी मातेची पूजा करतात. लक्ष्मी पूजन हा सण आपल्या आयुष्यात नवआशेचे दिवे,अंधारावार मात आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी मातेला वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य अर्पण केला जातो. लक्ष्मी पूजन सणाच्या दिवशी आपल्या संपत्तीत भर पडावी आणि संपत्तीचा जास्त ऱ्हास होऊ नये म्हणून तुम्हाला काही वास्तु टिप्स सांगणार आहोत.
आपण नेहमीच घर सजवताना नवनवीन सुंदर आणि मनवेधणाऱ्या वस्तूंची चित्रांची निवड करतो. आपल्या सुंदर आकर्षक सजावटीमुळे नेहमीच आपल्या घराची शोभा वाढत असते. प्रत्येकालाच स्वत:च्या हक्काचे घर सजवण्याची नेहमी इच्छा असते. पण कधीकधी आपण घर सजवताना आपण अशी चित्रे लावतो, ज्यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून प्रत्येक नागरिकाने घर सजवताना सकारात्मक चित्रे आणि वस्तूंचा वापर केला पाहिजे. यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहते.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये चित्र लावताना नेहमी अनुकल असणारी चित्रे लावावी. याबरोबर युद्ध, प्रसंग, वाळवंट, काटेरी रोप यांचे चित्र लावू नये. तसेच निसर्ग चित्र लावण्याआधी योग्य चित्राची निवड करावी. म्हणजे घरात तुम्ही झरा, धबधबा, समुद्र, नदी यांचे चित्र लावू शकता. ही चित्रे नेहमीच त्याच्या सुंदर निसर्गामुळे आपले लक्ष वेधून घेत असतात. पण वास्तुनुसार ही चित्रे लावल्याने आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या निसर्ग चित्रामुळे काय होऊ शकते.
घरात धबधबा, नदी यांचे चित्र दिसायला सुंदर असते. पण घरात हे चित्र लावल्याने आपला पैसा देखील पाण्यासारखा व्हावू शकतो. म्हणून घरात ही चित्रे लावणे टाळा. घरात कोणतेही चित्रे लावताना नेहमी काळजी घ्या. यामुळे आपल्या घरातील वास्तुवर परिणाम होतो. त्याचबरोबर आपल्या घरातील लोकांवर आरोग्याचा परिणाम आणि घराचे आर्थिक नुकसान होते. घरात ही चित्रे तुम्ही फक्त शोभेसाठी वापरु नका.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.