Beed Picnic Spot SAAM TV
लाईफस्टाईल

Beed Picnic Spot : पर्यटकांना 'बीड'ची ओढ, काळजाचा ठाव घेणारा निसर्ग

Best Holidays Destination : कुटुंबासोबत मोठी सुट्टी एन्जॉय करायची असेल तर 'बीड' हे बेस्ट लोकेशन आहे.

Shreya Maskar

महाराष्ट्रातील बीड (Beed ) जिल्हा पर्यटनाचे आकर्षण आहे. प्रत्येक वर्षी येथे हजारो पर्यटक येतात. तुम्ही सुद्धा आपल्या कुटुंबासोबत बीडला फिरण्याचा प्लान करा. येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे. तुम्ही मोठा वीकेंड येथे मस्त एन्जॉय करू शकता. बीडला गेल्यावर 'या' निसर्गरम्य ठिकाणांना आवर्जून भेट द्या.

अंबाजोगाई

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हे योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. योगेश्वरी देवी कोकणातील स्थानिक लोकांची कुलदेवत आहे. येथे इतर अनेक मंदिरे पाहाता येतात. उदा. नागनाथ मंदिर, अमृतेवश्वर इत्यादी. येथे हत्तीखाना देखील जवळ आहे. हत्तीखान्याला तुम्हाला वैष्णव आणि जैन लेण्यांचे दर्शन होईल. अंबाजोगाई हे ठिकाण घाटात येत, त्यामुळे निसर्गाच सुंदर दृश्य पाहायला मिळते.

परळी

बीडमधील परळी येथे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथाचे मंदिर आहे. या मंदिराला स्थानिक लोक तसेच पर्यटक देखील आवर्जून भेट देतात. या जवळ भुईकोट किल्ला देखील आहे.

भुईकोट किल्ला

बीडमधील धारूर येथे भुईकोट किल्ला वसलेला आहे. येथे आल्यावर तुम्हाला इतिहासाची आठवण होईल. भुईकोट किल्ल्याचा परिसर सौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या बाजूला तलाव देखील पाहायला मिळते. या किल्ल्याच्या परिसरात मंदिरे देखील आहेत.

कंकालेश्वर मंदिर

बीड येथील कंकालेश्वर मंदिर वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे. हे तलावाच्या मध्यभागी बांधलेले शिवमंदिर आहे. कंकालेश्वर मंदिर बिंदुसरा नदीच्या काठावर आहे.

खंडोबा मंदिर

बीड शहर हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. येथे प्रसिद्ध खंडोबा मंदिर आणि दीपमाळ आहे. खंडोबा मंदिराच्या समोरील भव्य सत्तर फुटी दीपमाळ उभारण्यात आली आहे. दीपमाळ बनवण्यासाठी वीट आणि चुन्याचा वापर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT