Street Wall Painting: डोंबिवलीच्या रस्त्यांवर दिसणार भारताचं वैभव; लोकसहभागातून बहरणार शहराचे सौंदर्य
Street Wall Paintings In Dombivali: शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून डोंबिवली शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येणार आहे.
प्रदीप भणगे
ठाकुर्ली मधील समांतर रोडला नागरिकांसाठी ओपन जीम, सेल्फी पाॅईंन्ट येथे बनविण्यात आले होता. मात्र कालांतराने त्याकडे झालेले दुर्लक्ष व रस्त्याच्या कामामुळे हे सौदर्य काहीसे बिघडले होते.
आता पुन्हा या रोडचे सौंदर्य खुलावण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांनी हाती घेतले आहे.बांधकाम व्यावसायिक विनायक पाटील यांनी सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयुक्त व शहर अभियंता यांनी आम्हाला या रोडचे सौदर्य वाढविण्याच्या दृष्टिकोणातून काम करण्यास सांगितले होते.कचोरे परिसरात असलेल्या 500 मीटर लांब भिंतीवर रंगकाम करण्यात येत आहे. यामध्ये आपल्या देशाचे नाव उंचावणारे खेळाडू, जुने कल्याण रेल्वे स्टेशन, दुर्गाडी किल्ला, सामाजिक कार्यकर्ते, डोंबिवली लोकल, राज्याची संस्कृती रेखाटण्यात येणार आहे. शहरातील भिंती लोकसहभागातून रंगवून शहराला एक वेगळेच सोंदर्य बहाल करण्यात येणार आहे. यासाठी शाळांतील चित्रकलेच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा व पुढे यावे असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.15 ऑगस्ट पर्यंत येथे काही ना काही छोटे कार्यक्रम करण्याचा मानस आहे.