Vastu Shastra tips for wealth saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips: वास्तू शास्त्राच्या या ४ टीप्सचं नक्की करा पालन; घरातील तिजोरी कधीही होणार नाही रिकामी

Vastu Shastra tips for wealth: भारतीय वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा आणि व्यवस्था थेट संपत्ती आणि सुखावर परिणाम करतात. योग्य वास्तु नियम पाळल्यास घरातील खजिना कधीच रिकामा राहत नाही आणि आर्थिक प्रगती होते.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपलं स्वतःच एक घर असावं. अनेक जण घर घेताना वास्तूचाही विचार करतात. वास्तुशास्त्रानुसार, घरात वास्तुदोष असल्यास कुटुंबातील सर्वांना जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याचप्रमाणे घरात पैसाही टिकत नाहीत.

जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर वास्तू शास्त्रात सांगितलेले विशेष उपाय वापरून पहा. असं मानण्यात येतं की, घरात असलेल्या दोषामुळे देवी लक्ष्मीचा वास राहत नाही, ज्यामुळे आर्थिक संकटाची समस्या उद्भवते. वास्तू शास्त्राचे कोणते नियम पाळले पाहिजेत ते पाहूयात.

या दिशेला ठेवावा झाडू

वास्तुशास्त्रात तुमच्या घरात झाडू ठेवण्याची शुभ दिशा सांगितली आहे. असं मानलं जातं की, चुकीच्या दिशेने झाडू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात. ज्यामुळे घरात शांती आणि आनंद राहत नाही. वास्तुशास्त्रानुसार, घरात झाडू ठेवण्यासाठी वायव्य दिशा शुभ मानली जाते. या दिशेने झाडू ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या

वास्तुशास्त्रानुसार, घरात पसारा आणि घाण हे वास्तुदोषांचं एक प्रमुख कारण आहे. कारण घाणीकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. धार्मिक श्रद्धेनुसार, संपत्तीची देवी लक्ष्मी गलिच्छ ठिकाणी राहत नाही. ज्यामुळे आर्थिक अडचणी येऊ शकतात. म्हणून, तुमच्या घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.

घरातील तिजोरीची दिशा

याव्यतिरिक्त, तिजोरी उत्तर दिशेला ठेवणं शुभ मानण्यात येतं. या दिशेला तिजोरी ठेवल्याने ती नेहमीच भरलेली राहते. शिवाय, कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी येत नाहीत. घरात असलेली तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका. त्यात नेहमी थोडे का असेना पैसै ठेवणं गरजेचं आहे.

वास्तू दोष असल्यावर कोणते संकेत मिळतात?

जर तुमच्या घरात वास्तू दोष असेल तर नकारात्मक उर्जा तुमच्या घरात जाणवू शकते. अशावेळी घरात भांडणं किंवा मोठे वाद होत असतात. त्याचप्रमाणे धनहानी होऊन घरात बिलकूल पैसा टिकत नाही. अशावेळी तुम्ही करत असेलल्या कामांमध्ये यशही मिळत नाही.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney cancer: ही ७ लक्षणं दिसली तर समजा किडनीचा कॅन्सर शरीरात करतोय घर; लगेच करून घ्या तपासणी

Namo Shetkari Yojana: ९४ लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर! १० दिवसात खात्यात जमा होणार ₹४०००

Silver Rate: बापरे! चांदीने ओलांडला ३ लाखांचा टप्पा! आज १ किलो चांदीसाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये

US Vs Iran: अमेरिका 48 तासात इराणवर करणार हल्ला? चीनची इराणला लष्करी मदत?

Maharashtra Live News Update: कल्याण–डोंबिवलीतील 53 नगरसेवक कोकण भवनच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT