Early signs of oral cancer saam tv
लाईफस्टाईल

Oral cancer symptoms: तोंडामध्ये 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात

Early signs of oral cancer: कोणताही आजार लगेच मोठा होत नाही, त्याची काही सुरुवातीची लक्षणे शरीरात दिसतात. पण अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचप्रमाणे, तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे देखील सुरुवातीला सहज ओळखता येतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • तोंडाचा कॅन्सर तंबाखू वापरामुळे होतो.

  • तोंडात लाल-पांढरे डाग धोक्याचे संकेत आहेत.

  • गाठ किंवा सूज वाढल्यास कॅन्सरचा संशय बाळगावा.

कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे, ज्यामुळे दरवर्षी जगभरातील हजारो-लाखो लोकांचे प्राण जातात. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी तोंडाचा कॅन्सर सर्वसामान्य मानला जातो. तंबाखूचं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये या आजाराचा धोका अधिक प्रमाणात असतो.

या आजाराच्या सुरुवातीला तोंडामध्ये काही लक्षणं दिसून येतता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर याची लक्षणं वेळीच ओळखली तर या रोगापासून उपचार घेऊन मुक्तता मिळवता येते. याची लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया

तोंडात लाल किंवा पांढरे डाग

जर तोंडाच्या आतील भागात लालसर किंवा पांढरे डाग दिसत असतील आणि ते दीर्घकाळ बरे होत नसतील, तर हे लक्षण धोक्याचे ठरू शकते. अशा वेळी त्वरित तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

सूज किंवा गाठ तयार होणं

तोंडाच्या कोणत्याही भागात गाठ तयार होणे किंवा सूज येणं ही बाब साधी नसते. विशेषत: वेळ जसा जातो तशी ही गाठ किंवा सूज वाढू लागली तर ती कॅन्सरकडे जाणारा इशारा असू शकतो.

बोलण्यात अडथळा येणं

बोलताना अडचण जाणवत असेल तर त्यामागे तोंडाच्या कॅन्सरची कारणं दडलेली असू शकतात. कॅन्सरचे पेशी वाढू लागल्यावर जीभ आणि जबड्याच्या स्नायूंवर परिणाम होतो. त्यामुळे आवाजात बदल होतो आणि बोलणे कठीण होते. यासोबत दात हलणे हेही एक लक्षण असू शकते.

अन्न चावण्यात त्रास

बर्‍याचदा लोक अन्न चावण्यातील अडचण दुर्लक्ष करतात, परंतु हे धोकादायक ठरू शकते. हा साधा त्रास नसून तोंडातील कॅन्सरची शक्यता दर्शवणारे लक्षण असू शकते.

कानात वेदना होणं

कानात दुखणं ही साधी गोष्ट असली तरी कोणत्याही कारणाशिवाय सतत होणाऱ्या वेदना हे तोंडाच्या कॅन्सरचं संकेत असू शकतं.

वजन कमी होणं

शरीराचं वजन वाढणं-घटणं हे आरोग्याविषयी बरेच काही सांगतं. जर कुठल्याही कारणाशिवाय वजन झपाट्याने कमी होऊ लागलं, तर तेही कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं.

तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात सामान्य कारण कोणते?

तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कॅन्सरचे मुख्य कारण आहे.

तोंडात लालसर डाग आल्यास काय करावे?

तातडीने तपासणी करून घ्यावी.

बोलण्यात अडचण कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण आहे.

कानात सतत दुखणे कोणत्या आजाराचा इशारा असू शकते?

तोंडाच्या कॅन्सरचा इशारा असू शकते.

अचानक वजन कमी होणे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

अचानक वजन कमी होणे कॅन्सरचे लक्षण आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Maharashtra Tourism : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

Lingayat Samaj : आम्ही हिंदू नाही, लिंगायत; जातीय सर्वक्षणातून मोठी मागणी | VIDEO

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT