Pancreatic Cancer  Saam Tv
लाईफस्टाईल

Pancreatic cancer: अचानक वजन कमी होत असेल तर सावध व्हा! काय आहेत स्वादुपिंडाच्या कॅन्सरची लक्षणं, तज्ज्ञांनी दिली माहिती

cancer: स्वादुपिंडाचा कॅन्सर हा स्वादुपिंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो, परंतु बहुतेक स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडाच्या वरच्या भागात आढळून येतो.

Surabhi Jayashree Jagdish

स्वादुपिंडात घातक पेशी तयार तेव्हा स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं निदान करता येतं. हे एक्सोक्राइन किंवा एंडोक्राइन ग्रंथींच्या कार्यासह स्वादुपिंडाच्या कार्यावर परिणाम करतं. स्वादुपिंडाचा कॅन्सर हा स्वादुपिंडाच्या कोणत्याही भागात होऊ शकतो, परंतु बहुतेक स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडाच्या वरच्या भागात आढळून येतो.

नवी मुंबईतील मेडिकवर रूग्णालयातील यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया यांचे संचालक डॉ शरणकुमार नरुटे यांच्या सांगण्यानुसार, हा आजार पाचन तंत्राचा भाग असलेल्या मोठ्या ग्रंथीवर परिणाम करतो. स्वादुपिंड ही पोटाच्या मागे आणि यकृताच्या खाली असलेली एक लांब ग्रंथी आहे. ते पित्ताशयाच्या जवळ पोटाच्या मागे स्थित असते. त्यात इन्सुलिन तसंच एन्झाईम्ससह हार्मोन तयार करण्यास मदत करणाऱ्या ग्रंथींचा समावेश असतो. हा कॅन्सर स्वादुपिंडाच्या कोणत्याही भागात अनियंत्रित पेशींची वाढ सुरू झाल्यास आढळून येतो.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची कारणं काय आहेत?

वय, पोटासंबंधीत संसर्ग, कामाच्या ठिकाणी येणारा ठराविक रसायनांशी संपर्क, आनुवंशिकता, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा, मद्यपान, अयोग्य आहाराचं सेवन त्याचप्रमाणे आहारात फळं आणि भाजीपाल्याचे समावेश नसणं इत्यादी.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणं

  • अचानक वजन कमी होणे

  • भूक न लागणे

  • त्वचेवर खाज सुटणे

  • मळमळणे

  • उलट्या होणे

  • कावीळ

  • ओटीपोटात दुखणे

  • पचनासंबंधी तक्रारी

  • कोरडी त्वचा

  • पाठदुखी

  • पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे

डॉ शरणकुमार नरुटे म्हणाले की, ही लक्षणं दिसताच त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणं बऱ्याचदा शेवटच्या टप्प्यात दिसून येतात. अशी लक्षणं दिसू लागली आणि प्रदीर्घ काळ टिकून राहिली, तर एकदा स्वादुपिंडाची तपासणी करून घेणे आवश्यक असते.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान कसे कराल?

सीटी किंवा एमआरआय स्कॅनद्वारे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान करता येऊ शकते. योग्य तपासणी करुन डॉक्टर त्याचे निदान करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करा अन्यथा उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार -अभय जगताप

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

SCROLL FOR NEXT