वजन कमी करायचं असेल तर अनेकजण पांढरा भात सोडून ब्राऊन राईस खातात. पांढऱ्या राईसपेक्षा ब्राऊन राईस जास्त हेल्दी मानला जातो. यामध्ये फायबरचं अधिक प्रमाण, पोषक तत्वं आणि ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. पण आता एका नवीन संशोधनातून ब्राऊन राईसबाबत एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे.
या नव्या अभ्यासानुसार, ब्राऊन राईस पोषक तत्वांनी समृद्ध असला तरी ते शरीरात आर्सेनिक नावाच्या धोकादायक घटकाचं प्रमाण वाढवू शकतात. या घटकामुळे ज्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या या अभ्यासातून असं दिसून आलंय की, ब्राऊन राई पांढऱ्या तांदळापेक्षा जास्त इनऑर्गेनिक आर्सेनिक असतात. जे शरीरासाठी अत्यंत विषारी मानले जातात. हा घटक पाण्यात विरघळतो आणि भाताच्या पिकामध्ये समाविष्ट होतो. विशेषतः ब्राऊन राईसमध्ये आर्सेनिकचे प्रमाण जास्त असतं.
संशोधनानुसार, अमेरिकेत पिकवल्या जाणाऱ्या ब्राऊन राईसमध्ये ४८% इनऑर्गेनिक आर्सेनिक असतं. तर पांढऱ्या तांदळात याचं प्रमाण ३३% असतं. जगभरात तपकिरी तांदळामध्ये 65% इनऑर्गेनिक आर्सेनिक आणि पांढऱ्या तांदळामध्ये 53% प्रमाण आढळून आलं आहे. हे आर्सेनिक शरीरात हळूहळू जमा होऊ शकते आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब्राऊन राईस पूर्णपणे खाणं बंद करावं असं नाही. परंतु त्याचं प्रमाण तुमच्या आहारात मर्यादित असलं पाहिजे. खास करून लहान मुलं, गर्भवती महिला आणि ज्यांचा मुख्य आहार भात आहे अशा लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
आहार तज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोषण आणि सुरक्षितता दोन्ही लक्षात घेऊन संतुलित आहार घेतला पाहिजे. ब्राऊन राईसमध्ये फायबर, प्रोटीन आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वं असतात. परंतु आर्सेनिकची उपस्थिती आरोग्यासंबंधीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करते. जर तुम्ही निरोगी राहण्यासाठी ब्राऊन राईस खात असाल, तर या संशोधनाकडे लक्ष देणं आणि तुमच्या आहाराची निवड करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.