Gel Nail Polish
Gel Nail Polish  Saam Tv
लाईफस्टाईल

Gel Nail Polish : जेल नेल पॉलिश ड्रायर वापरताय तर सावधान ! होऊ शकतो कॅन्सर, 'या' लक्षणांना दुर्लक्ष करू नका

कोमल दामुद्रे

Gel Nail Polish : बऱ्याच मुली नखांच्या सौंदर्यासाठी नेल पॉलिशचा वापर करतात. परंतु बऱ्याच मुली जेल नेल पॉलिश सुद्धा वापरतात. नेल पॉलिशने नखांना जास्त प्रमाणात चमक येते. त्याचबरोबर नखांची नेलपेंट लॉंग लास्टिंग राहते.

परंतु, जेल नेल पॉलिशसाठी नेल पॉलिश ड्रायर वापरणे हानिकारक ठरू शकते. स्टडीनुसार जेल नेल पॉलिश ड्रायर वापरल्याने काय होते? याचा अध्ययन समोर आला आहे. या अध्ययनामध्ये सांगितले आहे की जल नेल पॉलिश ड्रायर वापरल्याने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.

नेचर जर्नलमध्ये या संबंधित एक अध्ययन प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार दीर्घकाळ जर तुम्ही जेल नेल पॉलिश ट्रायल वापरत असाल तर तुम्हाला कॅन्सरची (Cancer) जोखीम उचलायला लागणार आहे.

अध्ययनामध्ये सांगितले आहे की, मॅनिक्युअरसाठी बऱ्याचदा नेल पॉलिश ड्रायरचा वापर करतात. या ड्रायरने अल्ट्रावायलेट किरणे बाहेर पडतात. कोणत्याही गोष्टीवर जास्त वेळ (Time) अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करणे अत्यंत हानिकारक ठरू शकते.

Gel Nail Polish

इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार न्यूयॉर्क पोस्टमध्ये वैज्ञानिकांनी सांगितले आहे की जेल नेल पॉलिश ड्रायरच्या कंपन्या सांगतात की, हे सेफ आहे परंतु कोणत्याही अध्ययनामध्ये असं लिहिलेलं नाही आहे की जेल नेल पॉलिश ड्रायरमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ शकत नाही.

लेखक प्रोफेसर लूडमिल अलेकजेंद्रोव यांनी सांगितले की, अल्ट्रावोलेट किरणांच्या प्रभावाने डी एन ए डॅमेज होतात. परंतु यामध्ये काही डीएनएनची बनावट नाही होत आणि ते म्युटेशन होऊन जातात. एवढेच नाही तर त्या अध्ययनामध्ये हे सुद्धा सांगितले आहे की, कोशिकांच्या आतमध्ये मायटोकोंड्रीयाचे फंक्शन बिघडतात. तेव्हा अजून म्युटेशन होऊ लागते. अध्ययनामध्ये काही स्कीन (Skin) कॅन्सर पीडित लोकांच्या कोशिकांचे विश्लेषण केले गेले आहे. त्यामध्ये सेम पॅटर्न दिसले आहे म्हणजेच डॅमेज डीएनए कोशिकाना कॅन्सर कोशिकांमध्ये बदलते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: रत्नागिरीत निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; 3 कोटी रुपयांची रोकड जप्त

Dindori Lok Sabha: आधी थोपटले दंड आता मिळवले हात; दिंडोरी लोकसभेतून जे पी गावितांची माघार

Govinda And Krushna Abhishek : कृष्णा- गोविंदा वादाचं नेमकं कारण काय?; गोविंदा जरा स्पष्टच बोलला

Raireshwar Fort: १६० मतदारांसाठी अधिकारी, कर्मचा-यांचा ४ हजार ५०५ फुटापर्यंत ट्रेक, रायरेश्वर केंद्र मतदानासाठी सज्ज

Black Pepper Benefits: काळी मिरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, घ्या जाणून

SCROLL FOR NEXT