Bank Of Maharashtra Bharti 2023
Bank Of Maharashtra Bharti 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Bank Of Maharashtra Bharti 2023 : बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज कसा आणि कुठे भरावा? वाचा सविस्तर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bank Jobs 2023 : सरकारी नोकरी मिळावी असं उच्चशिक्षित व्यक्तीपासून अगदी 10वी पास व्यक्तीला देखील वाटत असतं. आता सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांच हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रने मोठी भरती काढली आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्र बॅंकेत नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक 13 जुलै, गुरुवारपासून सुरू झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे. bankofmaharashtra.in. ही बॅंक ऑफ महाराष्ट्रची अधिकृत वेबसाईट (Website) आहे. या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 25 जुलैपर्यंतची मुदत आहे. या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

एवढ्या पदांसाठी होणार भरती

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या या भरतीमध्ये 400 जागा भरण्यात येणार आहे. यात भरतीमध्ये 100 पद ऑफिसर स्केल III तर 300 पद ऑफिसर स्केल IIसाठी आहेत.याबाबत इतर माहिती बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.

भरतीसाठी पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे. ही पदवी कोणत्याही शाखेतील असू शकते. वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, अधिकारी स्केल III साठी वयोमर्यादा 25 ते 38 वर्षे आहे आणि अधिकारी स्केल II साठी वयोमर्यादा 25 ते 35 वर्षे निश्चित केली आहे.

निवड करण्यात येईल

या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. त्यांची रॅंकिग 1:4 चा रेशिओनुसार करण्यात येईल.ऑनलाइन (Online) परीक्षा आणि मुलाखतीसाठी 150 आणि 100 गुण निश्चित केले आहेत. ते 75:25 च्या प्रमाणात पाहिले जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung ते Oppo, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भारतात लॉन्च होणार हे जबरदस्त स्मार्टफोन

Budh Gochar: एक जुलैपासून बुध करणार पुष्य नक्षत्रात प्रवेश; ५ राशींचं चमकणार नशीब

12GB RAM आणि 512GB स्टोरेज, Honor 200 Pro स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉन्च

England Team: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

Weekly Horoscope: आजपासून बदलणार या 5 राशींचे भाग्य, 7 दिवस सूर्यासारखे चमकेल नशीब

SCROLL FOR NEXT