Job Offer : ना IIT... ना IIM... पहिलीच नोकरी ८५ लाख रुपयांच्या पॅकेजची; कोण आहे राशी बग्गा?

Raipur News : राशीने रायपूरच्या एका कॉलेजमधून आपलं बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
Rashi Bagga
Rashi BaggaSaam TV

Raipur News : IIT, IIM मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या पगाराचे आकडे अनेकांचे डोळे पांढरे करणार असतात. शिक्षण संपल्यानंतर अनेका विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच लाखो रुपयांच्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. त्यामुळे दरवर्षी IIT, IIM कॅम्पस इंटरव्ह्यूची नेहमीच चर्चा असते. मात्र यंदा एका विद्यार्थिनीची चर्चा आहे जिने IIT किंवा IIM मधून नाहीतर रायपूरच्या एका कॉलेजमधून आपलं बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

राशी बग्गा असं या विद्यार्थिनिचं नाव आहे. आयआयटी, आयआयएममधून शिक्षण न घेता राशीला 85 लाखांचे सॅलरी पॅकेज मिळाले आहे. एका नामांकित कंपनीने ८५ लाखांच्या पॅकेजवर तिला नोकरीची ऑफर दिली आहे.

Rashi Bagga
SIP Calculator : 10 वर्षांत कोट्यधीश व्हायचंय? महिन्याला फक्त इतके पैसे गुंतवा, जाणून घ्या डीटेल्स

राशीने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नया रायपूर (IIIT NR) येथून B.Tech केले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, राशीला संस्थेच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळत असलेल्या ऑफरबद्दल समाधान होते. परंतु तिने आणखी शोध घेण्याचे ठरवले आणि शेवटी तिला यश मिळाले. (Breaking News)

Rashi Bagga
Jharkhand News : विद्यार्थिनी शाळेत टिकली लावून गेली, घरी आली आणि जीवनच संपवलं... काही तासात असं काय झालं?

100 टक्के प्लेसमेंट

रिपोर्टनुसार, IIIT NR च्या ग्रॅज्युएट बॅचने सलग 5 व्या वर्षी 100% प्लेसमेंट मिळवली आहे. गेल्या वर्षी येथील विद्यार्थ्याला प्लेसमेंटसाठी 57 लाखांचे पॅकेज ऑफर केले आहे. जे त्या बॅचचे सर्वोच्च पॅकेज होते. IIIT NR नुसार, यावर्षी प्लेसमेंटमध्ये सरासरी CTC 16.5 लाख होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com