Jharkhand News : विद्यार्थिनी शाळेत टिकली लावून गेली, घरी आली आणि जीवनच संपवलं... काही तासात असं काय झालं?

Crime News in Jharkhand : मारहाण करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
Buldhana Crime News
Buldhana Crime NewsSaam TV

Jharkhand student News : झारंखडमध्ये विद्यार्थिनीने आत्यहत्या केल्याची घटना समोर आली आहे. टिकली लावली म्हणून शिक्षकाने मारल्यामुळे विद्यार्थिनीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी धनबादमधील एक विद्यार्थिनी टिकली लावून शाळेत गेली होती. मात्र टिकली लावली म्हणून शिक्षकांनी तिला कानशिलात लगावली होती. मात्र ही गोष्ट विद्यार्थिनीच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. त्यानंतर तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Latest News Update)

Buldhana Crime News
Shocking News: बायकोने १० वर्षात ७ वेळा नवऱ्याला तुरुंगात पाठवलं, प्रत्येकवेळी स्वत:च सोडवून आणलं; कारण चक्रावणारं

सुसाईड नोटही सापडली

मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने टिकली लावली हे पाहून शिक्षकाला राग आला होता . प्रार्थनेदरम्यान शिक्षकाने विद्यार्थिनीला टिकली लावल्याबद्दल शिक्षकाने जाब विचारला होता. मात्र शिक्षकाच्या प्रश्नावर विद्यार्थिनीने उलट उत्तर दिले. यावर शिक्षकाने विद्यार्थिनीला चापट मारली. शिक्षिकेच्या या वागण्याने विद्यार्थिनी इतकी दुखावली गेली की तिने घरी पोहोचताच गळफास लावून घेतला. मुलीच्या शाळेच्या ड्रेसमध्ये एक सुसाईड नोटही सापडली आहे. (Crime News)

Buldhana Crime News
Delhi Crime News: दिल्लीत पुन्हा श्रद्धा वालकरसारखं हत्याकांड?, तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करुन उड्डाणपुलाखाली टाकले

शिक्षकाला अटक

धनबाद येथील बाल कल्याण समितीचे (CWC) अध्यक्ष उत्तम मुखर्जी यांनी सांगितले की, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. NCPCR चेअरपर्सन यांना उत्तर देताना उत्तम मुखर्जी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, ही गंभीर बाब आहे. ही शाळा देखील CBSE बोर्डाशी संलग्न नाही. याची माहिती मी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे. आज मी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com